अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरूवात होतेय. शुक्रवारी 01 फेब्रुवारीला केंद्र सरकार आपल्या कारकिर्दीतला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातला सहआरोपी  दिपक तलवार आणि राजीव सक्सेना यांना आज भारतात आणलं जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पाडण्यात आली.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियांका गांधी आता सोशल मीडियावरही सक्रिय होणार असून त्यांचं फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट सुरू करण्याची जोरदार तयारी काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही राज्यातल्या खासदारांना भेटणार आहेत. गेली दोन दिवस ते खासदारांच्या विभागवार बैठका घेत आहेत. युतीबाबतचं मत आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राज्यातली स्थिती जाणून घेणार आहे. त्याचबरोबर स्वबळावर लढायचं का याची चाचपणीही ते करणार आहेत.

First published: January 31, 2019, 7:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading