Good Morning :या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या, ज्या तुमचा दिवस बनवतील खास!

Good Morning :या आहेत आजच्या 5  मोठ्या बातम्या, ज्या तुमचा दिवस बनवतील खास!

  • Share this:

  • मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणारआहे. सकाळी साडे दहा वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार आहे. बुधवारी रात्री मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधीमंडळात एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती दिली.
  • सीबीआयचे माजी प्रमुख अलोक वर्मा यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. वर्मा यांनी केंद्र सरकारने केलेल्या कारावाईला कोर्टोत आव्हान दिलं होतं. त्यावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
  • नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये आजही विविध समाजिक संघटना आंदोलनं करणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी दबाव आणल्यानंतर मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात बदली करण्यात आली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 देशांच्या परिषदेसाठी अर्जेटिनाच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे चिनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतील. त्याचबरोबर ब्रिक्स च्या नेत्यांनाही भेटणार आहेत.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज आणखी एक विक्रम करणार आहे. PSLV-C43 या रॉकेट लाँचरच्या मदतीनं भारतासह इतर 30 उपग्रह सोडणार आहे. श्रीहरीकोटा इथल्या केंद्रावरून हे उड्डाण होणार आहे.

 

First published: November 29, 2018, 12:05 AM IST

ताज्या बातम्या