काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला होणार सुरुवात, या आहेत आजच्या 5 महत्वाच्या बातम्या

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला होणार सुरुवात, या आहेत आजच्या 5 महत्वाच्या बातम्या

  • Share this:

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब येथून आज काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते या यात्रेत सहभागी होतील.

आरे च्या जंगलातली आग

मुंबईतल्या आरे कॉलनितल्या जंगलाला लागलेली आग विझली असली तरी त्यामुळं वनसंपदेचं प्रचंड नुकसान झालंय. आज सकाळी ज्येष्ठ वनाधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करणार आहे. आग लावली की लागली याचा शोध घेतला जातोय.

नौदल दिवस

नौदल दिवसानिमित्त मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथं एका शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नौदलाचे जवान आकर्ष प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. तर संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम होणार आहे.

योगाचार्य

योगाचार्य बीकेएस अंय्यगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात 50 देशातले 1200 योगप्रेमी आले असून ते योगाची प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. पुणेकरांना ही एक मेजवानीच असणार आहे.

निवडणूक प्रचार

राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अमित शहा, यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज राजस्थान आणि तेलंगणात असणार आहेत.

First published: December 3, 2018, 11:44 PM IST

ताज्या बातम्या