Good Morning : आजच्या या आहेत 5 मोठ्या बातम्या, ज्या तुमचा दिवस बनवतील खास!

Good Morning : आजच्या या आहेत 5 मोठ्या बातम्या, ज्या तुमचा दिवस बनवतील खास!

  • Share this:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, अभिनेता शहारूख खान आणि सचिन तेंडूलकर शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात भाषणांची जुगलबंदी रंगण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांच लक्ष राहणार आहे.

रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोन यांच्या लग्नाचं तिसरं आणि शेवटचं रिसेप्शन आज मुंबईत होतंय. हे रिसेप्शन खास बॉलिवूडच्या मित्रांसाठी असणार आहे. या आधी बंगळूरू आणि मुंबईत दोन रिसेसप्शन्स झाली होती. या पार्टीला बॉलिवूडची सर्व दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहे.

डोंबिवलीत आज श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. दिवसभर महोत्सव चालणार असून डोंबिवली शहरात अनेक भागात आकर्षक लायटिंगसुद्धा करण्यात आलीय. तिरुपतीला मिळणार प्रसाद म्हणजे प्रसिद्ध लाडू.  हाच प्रसाद(लाडू) या महोत्सवात येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद म्हणून दिला जाणार आहे. त्यासाठी तब्बल 1 लाख प्रसादाचे लाडू खास तिरुपतीवरून आणले असून त्याचबरोबर तिरुपती येथे मिळणारे वडेसुद्धा भाविकांना प्रसाद म्हणून मिळणार  आहेत. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत.

अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम तातडीने सुरू व्हावं यासाठी जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे. आजपासून अयोध्येत महायज्ञ सुरू होणार असून देशभरातले साधू संत त्यात सहभागी होणार आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा  प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रसारासाठी आज राजस्थनातल्या विविध शहरांमध्ये आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी,  भाजपाध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज हे दिग्गज नेते झंझावती प्रचार करणार आहेत.

 

 

First published: December 1, 2018, 12:04 AM IST

ताज्या बातम्या