दशकानंतर देशात पामतेलावरील आयातशुल्कात वाढ ; भारतात देशीतेलबियांना प्रोत्साहन मिळणार?

दशकानंतर देशात पामतेलावरील आयातशुल्कात वाढ ; भारतात देशीतेलबियांना प्रोत्साहन मिळणार?

गेल्या अनेक दशकांपासून भारत पामतेलाची सगळ्यात जास्त आयात करून देशातली खाद्यतेलाची अंदाजे ६०% पेक्षा जास्तीची गरज भागवली जाते आहे. पण यामुळं देशात पिकणाऱ्या तेलबियांचे (उदा. सोयाबीन, मोहरी, तीळ, जवस, भुईमूग, सुर्यफूल) यांचे बाजारभाव सतत हमीभावापेक्षा कमी राहात होते.

  • Share this:

02 मार्च: केंद्र सरकारनं काल देशातल्या तेलबिया उत्पादकांच्या हितासाठी खाद्यतेल आयातीवर अप्रत्यक्ष निर्बंध घालणारा आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतलाय. क्रूड आणि रिफाईंड पाम तेलावर गेल्या दशकातली सर्वाधिक इंपोर्ट ड्युटी लावण्याचं धाडस केंद्र सरकारनं दाखवलंय.

गेल्या अनेक दशकांपासून भारत पामतेलाची सगळ्यात जास्त आयात करून देशातली खाद्यतेलाची अंदाजे ६०% पेक्षा जास्तीची गरज भागवली जाते आहे. पण यामुळं देशात पिकणाऱ्या तेलबियांचे (उदा. सोयाबीन, मोहरी, तीळ, जवस, भुईमूग, सुर्यफूल) यांचे बाजारभाव सतत हमीभावापेक्षा कमी राहात होते. यंदा तेलबियांचे भाव हमीभावापेक्षा खाली घसरू नयेत, किंबहुना त्यात चांगली वाढ व्हावी म्हणून सरकारच्या वाणिज्य आणि अर्थमंत्रालयानं हा निर्णय घेतलाय.

कालपर्यंत क्रूड पामतेलावर ३०% आयातकर होता तर आता तो ४४% इतका असणार आहे. तर रिफाईंड पामतेलावर ४०% आयातकर होता, आता तो ५४% इतका असणार आहे. आता मुंबई बंदरात येणाऱ्या प्रतिटन पामतेलाचा दर हा पूर्वीच्या ६९५ डॉलरच्या तुलनेत ८१२ डॉलर असणार आहे. म्हणजे यात ११७ डॉलरने वाढ होणार आहे.

भारत हा पामतेलाचा जगातला सगळ्यात मोठा खरेदीदार ग्राहक देश आहे. इंडोनेशिया आणि मलेशियातून सर्वाधिक पामतेलाची भारतात आयात होते. जर भारताकडून पाम तेलासारख्या महत्त्वाच्या खाद्यतेलाच्या आयातीवर लगाम घालण्याचे संकेत गेले तर याचा देशातल्या तेलबियांच्या बाजारावर नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळेल असं या क्षेत्रातले जाणकार सांगतायत.

पण आता यामुळे येत्या काळात देशी तेलबियांना प्रोत्साहन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

असं असेल नवीन आयातशुल्क

१. क्रूड पामतेलावर ३० ऐवजी ४४% आयातकर.

२. रिफाईंड पामतेलावर ४० ऐवजी ५४% आयातकर.

३. प्रतिटन ११७ डॉलरची होणार भाववाढ.

४. आयातशुल्कवाढीचा सोयाबीन, सुर्यफूल आणि मोहरी पिकाला सर्वाधिक फायदा.

५. मोहरीच्या काढणीहंगामापूर्वी मोठा निर्णय.

First published: March 2, 2018, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading