Home /News /national /

जेवणातील तडका महागणार? हिंगाच्या किंमती वाढण्याची शक्यता

जेवणातील तडका महागणार? हिंगाच्या किंमती वाढण्याची शक्यता

सरकार अफगानिस्तानमधून भारतात येणाऱ्या हिंगावर इंपोर्ट ड्यूटी अर्थात आयात कर वाढवण्याच्या तयारीत असल्याची भारतीय बाजारात चर्चा आहे.

    नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : स्वयंपाक घरातील महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ, जेवणाचा स्वाद वाढवणारं आणि पचनासाठी उत्तम मानलं जाणारं हिंग Asafoetida महागण्याची शक्यता आहे. सरकार अफगानिस्तानमधून Afghanistan भारतात येणाऱ्या हिंगावर इंपोर्ट ड्यूटी Import Duty अर्थात आयात कर वाढवण्याच्या तयारीत असल्याची भारतीय बाजारात चर्चा आहे. उज्बेकिस्तानमुळे हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 टक्के इंपोर्ट ड्यूटी वाढवण्याची चर्चा दिल्लीतील घाऊक व्यवसायिकाने सांगितलं की, सध्याच्या स्थितीत उज्बेकिस्तानमधून 27 टक्के आणि अफगानिस्तानातून 5 टक्के इंपोर्ट ड्यूटीवर हिंगाचा कच्चा माल भारतात येत होता. परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की, उज्बेकिस्तानमधून येणारा कच्चा मालही आता अफगानिस्तानातून भारतात येणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातून येणाऱ्या हिंगाच्या कच्च्या मालावरील इंपोर्ट ड्यूटी समान दरात करण्याचा सरकारचा मानस आहे. हे वाचा - फेसबुकमुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो परिणाम; धक्कादायक माहिती उघड घाऊक व्यापार करणाऱ्या आणखी एका व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंपोर्ट ड्यूटी वाढवण्याच्या चर्चेने व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. साडे आठ ते नऊ हजार रुपये प्रति किलो येणारा कच्चा माल सध्या 10 हजार रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. इंपोर्ट ड्यूटी वाढवण्याच्या चर्चेदरम्यान, कच्चा माल जमा करण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंग बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल ईराण, अफगानिस्तान, कजाकिस्तान आणि उज्बेकिस्तानमधून येतो. एका वर्षात जवळपास 600 कोटींचा कच्चा माल भारतात खरेदी केला जातो. हे वाचा - कर्जदारांना मोदी सरकारने दिला मोठा दिलासा, व्याजाबाबत दिली महत्त्वाची माहिती काय असतील किंमती हिंगाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात हिंगाचा भाव 12 हजार रुपये ते 14 हजार रुपयांपर्यंत आहे. कोरोना काळात कच्चा माल कमी येत असतानाही हाच भाव होता. परंतु इंपोर्ट ड्यूटी वाढल्यास हा भाव 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वाचा - खोट्या ईमेलपासून सावधान; बँकिंग फ्रॉडबाबत RBIचा इशारा
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या