नवनीत राणांचा पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, लोकसभेत केली मोठी मागणी

नवनीत राणांचा पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, लोकसभेत केली मोठी मागणी

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानी असलेल्या 'मातोश्री'वर बसून फुकटचे सल्ले देत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवरून नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी लोकसभेत केली आहे.

'कोरोना काळात खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लाखो रुपयांनी लूट होत आहे. ही खाजगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे', अशी माहिती नवनीत राणा यांनी राज्यसभेत दिली.

तर,'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानी असलेल्या 'मातोश्री'वर बसून फुकटचे सल्ले देत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी', खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यांकडे केली आहे.

'महाराष्ट्र सरकारने खाजगी दवाखाने मर्यादा 10 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर करावी, पीएम फंडमधून महाराष्ट्र, विदर्भाला भरीव मदत करावी' अशी मागणीही नवनीत राणा यांनी लोकसभेत केली.

नवनीत राणा यांनी याआधीही ठाकरे सरकारवर टीका केली होती. शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणावर राणा यांनी थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मदन शर्मांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नवनीत राणांनी केली होती. तसंच कंगना राणावतच्या ऑफिसच्या तोडफोड प्रकरणावरूनही नवनीत राणांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

Published by: sachin Salve
First published: September 21, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading