S M L

सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव?

देशात न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याचं वक्तव्य कपिल सिब्बल यांनी केलं आहे. विरोधी पक्षासह सात पक्ष महाभियोग आणण्याच्या तयारीत आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 24, 2018 10:56 AM IST

सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव?

20 एप्रिल:जज लोया प्रकरणाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात  महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यासाठी उपराष्ट्रपतींची भेट घेऊन ड्राफ्टही त्यांना सुपूर्त करण्यात आला.

देशात न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य  धोक्यात आल्याचं वक्तव्य कपिल सिब्बल  यांनी केलं आहे.  विरोधी पक्षासह सात पक्ष महाभियोग आणण्याच्या तयारीत आहेत.  71 खासदारांचा  या महाभियोगाला पाठिंबा आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने काल लोया प्रकरणी  चौकशी गरजेची नाही असा निकाल दिला होता. याआधीच अॅट्रोसिटीच्या निकालावरूनसुद्धा त्यांच्याविरूद्ध महाभियोग आणायची चर्चा होती. कॉंग्रेस , राष्ट्रवादी , सपा , बसपा , भाकप , माकप आणि डीएमके खासदारांनी नोटीसीवर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत.  काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या काही न्यायमुर्तींनीच  सरन्यायाधीशांविरूद्ध पत्रकार परिषद घेतली होती.

आता या महाभियोग प्रस्तावाच पुढे काय होतं. त्याला मान्यता मिळते का आणि काय राजकारण खेळलं जातं  हे सारंच पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 01:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close