योगींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री

योगींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री

मायावती आणि योगी आदित्यनाथ यांच्या तोडीचा उत्तर प्रदेशमध्ये नेता काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे काँग्रेसने ही खेळी खेळली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 जानेवारी : प्रियांका गांधी यांच्या या राजकीय प्रवेशाने उत्तर प्रदेशचं गणित बदण्याची शक्यता आहे. याधीही प्रियांकांनी उत्तर प्रदेशात प्रचार केला होता. पण त्यांचा प्रचार फक्त अमेठी आणि रायबरेली मतदार संघापुरताच मर्यादीत होता. गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी गावागावत जाऊन प्रचार केला होता. मात्र सक्रिय राजकारणात येण्याचं त्यांनी टाळलं होतं.

भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्याकडे नेतृत्व असल्याने त्यांच्या उग्र हिंदुत्वाचा उत्तर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पुढे केलं अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण अखिलेख,  मायावती आणि योगी आदित्यनाथ यांच्या तोडीचा उत्तर प्रदेशमध्ये नेता काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे काँग्रेसने ही खेळी खेळली आहे.

उत्तर प्रदेशात या आधी समाजवादी पक्ष आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि यादव मतदारांचं ध्रुविकरण होणार असा अंदाज बांधला जात होता. त्याचा फटका काँग्रेसलाच बसला असता. त्यामुळे तातडीने पावलं टाकत काँग्रेसने प्रियांका गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशची कमान दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक महत्त्वाच्या व्यक्तीला राजकारणात आणले आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी पूर्ण झाली आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांनी पक्षातील सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे.

 

First published: January 23, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading