मान्सून हूल देणार की वेळेत येणार? पावसाबाबतचा जाणून घ्या अंदाज

मान्सून हूल देणार की वेळेत येणार? पावसाबाबतचा जाणून घ्या अंदाज

यंदा मान्सूनबाबत IMD नं काय वर्तवला अंदाज? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आलं. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला. मात्र हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आताच मान्सूनसंदर्भात काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. आतापर्यंतच्या अंदाजानुसार अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.

यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

First published: April 12, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading