पुढच्या 3 दिवसांत मान्सून येणार, हवामान खात्याने दिली माहिती

खरंतर यंदा मान्सून लांबण्याची शक्यता असल्याचं स्कायमेट म्हटलं आहे. पण तीन दिवसात भारतात या ठिकाणी मान्सूनचा पहिला पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 03:59 PM IST

पुढच्या 3 दिवसांत मान्सून येणार, हवामान खात्याने दिली माहिती

नवी दिल्ली, 15 मे : खासगी क्षेत्रातील कंपनी स्कायमेटनं दिलेल्या मान्सूनच्या अंदाजानंतर आता भारतीय हवामान खात्यानंही यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. पहिला पाऊस 18-19 मेपर्यंत अंदमान निकोबारमध्ये होण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये 6 जूनपर्यंत पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. खरंतर यंदा मान्सून लांबण्याची शक्यता असल्याचं स्कायमेट म्हटलं आहे. पण तीन दिवसात भारतात या ठिकाणी मान्सूनचा पहिला पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

नेहमीप्रमाणे विचार केला तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून 5 दिवस उशिरा दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनबद्दलचे नवे अंदाज दिले होते. त्यानुसार, यंदाचा मान्सून उशिरा सुरू होणार असून 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं होतं.

केरळमध्ये 4 जूनला मान्सून होणार असून अंदमानमध्ये 22 मे रोजी पाऊस हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात आलं. तर यंदा सरासरी 93 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून देण्यात आला आहे.6 जूनला मान्सून केरळमध्ये होणार दाखल...

हवामान खात्याने म्हटलं आहे की, यंदा मान्सून 19-19 मेपर्यंत अंदमानमध्ये तर 6 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे.

काय आहे अल निनो वादळ?

- प्रशांत महासागरात, पेरूच्या जवळील किनारपट्टीवर उष्णता वाढते त्याला  अल निनो म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सातत्याने वाढत आहे.

- मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

- हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.'

- यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा : दुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू', डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा

कुठे होणार सगळ्यात कमी पाऊस

- स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी बंगाल, बिहार, झारखंडमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे.

- भारतामध्ये पूर्वेला 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मध्य भारतात मान्सून 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो.

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...