मुंबई 24 मे: सगळ्या देशात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच आता उन्हाचा प्रकोपही वाढत आहे. देशात आठवडाभर आणखी तापमान वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही तापमान वाढणार असून विदर्भ आणि मराठवाडा होरपळून निघण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात आलेलं चक्रिवादळ आणि त्यानंतर बदललेली स्थिती यामुळे सरासरीपेक्षा 4 ते 5 डिग्री तापमान जास्त राहणार आहे. राजस्थानातल्या चुरू इथं देशात सर्वात जास्त 46.6 एवढं तापमान नोंदलं गेलं.
या तापमानामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळए नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. कारण सध्याच्या वातावरणात प्रकृतीवर परिणाम होणं परवडणारं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
काही भागात तापमान 44 अंशांच्या आसपास तापमना गेलं आहे. हवामानशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की 3 ते 4 दिवसांत उष्णता वाढेल. परंतु, येत्या 24 तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पंजाब, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत ओडिशा, पूर्व झारखंड आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि किनारपट्टीवरील कर्नाटकात पावसाचे काम कमी होईल, परंतु काही ठिकाणी जोरदार सरी बरसत राहतील.
कोरोनाव्हायरसविरोधात कधी येणार औषध? भारतातील तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून वेळेत केरळमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान आणि केरळपासून दाखल होत मग पुढे उत्तर भारतात त्याचा प्रवास सुरु होतो. दक्षित पश्चिम मान्सून अंदमान समुद्रासह जवळपासच्या परिसरात दाखल झाला आहे. केरळमध्ये 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा सध्याचा प्रवास पाहता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत दाखल होईल असं सांगण्यात येत आहे.
जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट
केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात गेल्या काही वर्षात सातत्यानं बदल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.