'या' महिन्यापासून बरसणार मुसळधार पाऊस, IMDचा दिलासा

'या' महिन्यापासून बरसणार मुसळधार पाऊस, IMDचा दिलासा

जीवघेण्या उन्हाळ्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांसह देशवासीयांसाठीही एक खूशखबर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : जीवघेण्या उन्हाळ्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांसह देशवासीयांसाठीही एक खूशखबर आहे. लवकरच देशभरात पाऊस हजेरी लावणार आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसंच अल निनो पुढे सरकण्याची शक्यताही खूपच कमी असल्याचं दिसत आहे. पुढील महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे झाल्यास देशातील नागरिकांसह, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असेल. कारण, दमदार पाऊस झाल्याचा याचा चांगला परिणाम थेट शेतीसह अन्य बाबींवरही होईल. यंदा 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही.

दुसरीकडे, यापूर्वी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दपम्यान, जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात हवामान विभागाकडून मान्सूनसंदर्भातील पुढील माहिती दिली जाणार आहे.

वाचा :मोदी सरकार राहणार की जाणार? भेंडवळच्या घटमांडणीचा 'हा' आहे राजकीय अंदाज

अल निनोचा प्रभाव

अल निनोमुळे समुद्री वाऱ्यांची दिशा बदलली जाते. परिणामी, ज्या क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता असते तेथे पाऊस पडत नाही आणि याउलट जेथे विरळ पावसाचा अंदाज वर्तवलेला असतो, तेथे मुसळधार पाऊस पडतो.

वाचा :महाराष्ट्रात कशी असणार पावसाची स्थिती? भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर

महागाईवर बसेल आळा

प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यास देशातील कित्येक क्षेत्रांतील आर्थिक आकड्यांमध्ये सुधारणा होईल. यामुळे सर्वसामान्याचं महागाईमुळे कंबरडं मोडणार नाही.

नरेंद्र मोदींनी का केलं राजीव गांधींना टार्गेट? पाहा हा SPECIAL REPORT

First published: May 10, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading