नवी दिल्ली, 9 डिसेंबर : धर्माबाबत विवादित वक्तव्य आणि आपल्या बंडखोर लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) आपल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बांगलादेशातील मशिदी-मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत असल्याचा आरोप तस्लीमा नसरीन यांनी केला आहे. तस्लीमा नसरीन यांनी ट्विटरवरुन बांगलादेशातील मशिदी-मदरशांवर ताशेरे ओढले आहेत.
तसलीमा नसरीन (Taslima Nasrin) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये इमाम आणि मदरशांमधील शिक्षक दररोज मुलांवर बलात्कार करतात. ते अल्लाहाच्या नावावर रेप करतात. त्यांना माहिती आहे की, अल्लाह दयावान आहे. ते दिवसातून 5 वेळा नमाज पठण केलं तर अल्लाह त्यांच्या चूका, त्यांनी केलेले पाप माफ करेल.
हे ही वाचा-4 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, चारित्र्यावर संशय घेऊन आवळला पत्नीचा गळा
Imams and Madrasa teachers have been raping children in mosques and madrasas in Bangladesh everyday. They rape in the name of Allah. They know Allah is merciful, so Allah will forgive their sins only if they pray 5 times a day. https://t.co/Yeq13ldxrb
— taslima nasreen (@taslimanasreen) December 7, 2020
बांगलादेशातील मूळच्या तस्लीमा नसरीन धर्मातील रूढींच्या नावाखाली होणार्या ढोंगीपणाविरूद्ध आवाज उठवत राहिल्या आहेत. यामुळे, तिला बर्याचदा कट्टरपंथी लोकांकडून लक्ष्य केले जाते. तस्लीमा नसरीन यांच्याविरोधात अनेकदा फतवा काढण्यात आला आहे आणि तिला हत्येची धमकीही देण्यात आली आहे. याकारणामुळे तस्लीमा नसरीन यांना आपला देश बांगलादेशातून निर्वासित व्हावे लागले होते. सध्या त्या भारतात राहत आहेत.
यापूर्वी ऑस्कर अवॉर्ड विजेते संगीतकार एआर रेहमान यांची मुलगी खतिजावर केलेल्या वक्तव्यामुळे तस्लीमा नसरीन चर्चेत आल्या होत्या. तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी सोशल मीडियावर एआर रेहमान यांच्या मुलीवर बुरखा घालण्यावरुन टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की खातिजाला पाहून दम घुसमटतो. ज्यानंतर सोशल मीडियावर यावरुन चर्चा सुरू झाली होती.