S M L

आयएमचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी

दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 22, 2018 01:30 PM IST

आयएमचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी

22 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे..कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे.

अब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचंही नाव होतं.

इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुरेशी हा उद्युक्त करत असल्याचंही समोर आलं आहे. दिल्लीच नव्हे तर देशातल्या इतर भागातील दहशतवादी हल्ल्यातही कुरेशी सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2008च्या बॉम्बस्फोटात मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांनीही चौकशीत कुरेशी याचं नाव घेतलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरातमधल्या दहशतवादी हल्ल्यातही कुरेशीचा हात होता.

गेली 15 वर्ष पोलीस कुरेशीचा शोध घेत होते. त्याला भारताचा बिन लादेन म्हटलं जातं. त्याला दहशतवादाचा हायटेक चेहरा मानलं जातं. विप्रो कंपनीतली नोकरी सोडून तो इथे वळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 01:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close