मराठी बातम्या /बातम्या /देश /दरमहिन्याचे 5 हजार घेईन; सासरी राहण्यासाठी पत्नीने घातली अट, पती Shocked!

दरमहिन्याचे 5 हजार घेईन; सासरी राहण्यासाठी पत्नीने घातली अट, पती Shocked!

घर सांभाळणारी महिलादेखील मोठं काम करीत असते. तिलाही तिच्या कामाचा मोबदला दिला जावा, असं अनेकदा म्हटलंही जातं.

घर सांभाळणारी महिलादेखील मोठं काम करीत असते. तिलाही तिच्या कामाचा मोबदला दिला जावा, असं अनेकदा म्हटलंही जातं.

घर सांभाळणारी महिलादेखील मोठं काम करीत असते. तिलाही तिच्या कामाचा मोबदला दिला जावा, असं अनेकदा म्हटलंही जातं.

पाटना, 13 ऑगस्ट : बिहारमधील पौर्णिया जिल्ह्यात पोलिसांच्या समुपदेशन केंद्रात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. घर सांभाळणारी महिलादेखील मोठं काम करीत असते. तिलाही तिच्या कामाचा मोबदला दिला जावा, असं अनेकदा म्हटलंही जातं. मात्र बिहारमध्ये तर प्रत्यक्षात एका महिलेने महिन्याला 5 हजार रुपयांची मागणी केली आहे.

महिलेने अटच घातली आहे की, जर पती दर महिन्याला 5 हजार रुपये देईल, तरच ती त्याच्यासोबत येईल. शेवटी पती तरी काय करणार, त्याने पत्नीची ही अट मान्यही केली. आता पत्नीचं बँक अकाऊंट उघडून देईन आणि त्यात दर महिन्याला पैसे जमा करेन असं आश्वासन पतीने दिलं आहे.

जीन्सने संपवलं 7 जन्माचं नातं, पतीने कपड्यांवरून टोकलं आणि घात झाला...

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती कामानिमित्ताने कधी दिल्ली तर कधी पंजाबला जात असतो. इथं मात्र महिला कशी बशी घर चालवते. त्यामुळे तिने पतीला दर महिन्याला 5 हजार रुपयांची अट घातली. शेवटी पतीने हे मान्य केलं. पोलीस समुपदेशन केंद्रात पती-पत्नीमधील हा गुंता सोडवण्यात आला.

First published:

Tags: Bihar, Wife and husband