'माझीही काही स्वप्नं होती पण आता सगळं संपलं आहे', IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आयआयटी हैदराबाद मध्ये एमटेकच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हॉस्टेलच्या खोलीमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मार्क अँड्र्यू चार्ल्स असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो वाराणसीचा आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 09:51 PM IST

'माझीही काही स्वप्नं होती पण आता सगळं संपलं आहे', IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हैदराबाद, 3 जुलै : आयआयटी हैदराबाद मध्ये एमटेकच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हॉस्टेलच्या खोलीमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मार्क अँड्र्यू चार्ल्स असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो वाराणसीचा आहे.

परीक्षेतले कमी गुण आणि नोकरी न मिळण्याच्या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली आहे. पण त्याने आपल्या मित्रांना संदेशही दिला आहे. एकच आयुष्य असतं आणि ते बरबाद करू नका, असं त्याने या संदेशात म्हटलं आहे.

कोणीही अयशस्वी विद्यार्थ्याला नोकरी देत नाही. सगळ्यांसारखीच माझीही स्वप्नं होती पण आता सगळं संपलं आहे, असं त्याने आठ पानांच्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

'काँग्रेस माझ्या रक्तात आहे', राहुल गांधींचं भावूक राजीनामापत्र

त्याने आपले कुटुंबीय आणि मित्रांची माफी मागितली आहे. मी तुम्हाला अशा प्रकारे निराश करेन, असं वाटलं नव्हतं. पण तुम्ही माझी आठवण ठेवावी एवढ्या योग्यतेचा मी नाही. मी घरापासून दूर होतो पण मला आयआयटीमध्ये चांगले मित्र मिळाले. मी देशातल्या सर्वोत्तम इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होतो पण मीच सगळं बरबाद करून बसलो, असंही त्याने लिहिलं आहे.

Loading...

माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा माझा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करावा, असंही त्याने म्हटलं आहे. माझा फायदा निदान भावी डॉक्टरांना तरी व्हावा, अशी माझी इच्छा आहे, असं त्याने नमूद केलं आहे.

आयआयटीमध्ये झालेली ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं होतं.

========================================================================================

VIDEO : पुण्यातले रँचो! 55 दिवसांत बनवली 'बॅटमॅन' कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...