मराठी बातम्या /बातम्या /देश /...तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल, IIT संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

...तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल, IIT संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

Climate Change: हिमालयातलं वातावरण बदलत आहे. असं सुरू राहिलं तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

Climate Change: हिमालयातलं वातावरण बदलत आहे. असं सुरू राहिलं तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

Climate Change: हिमालयातलं वातावरण बदलत आहे. असं सुरू राहिलं तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली, 14 जून : पृथ्वीवरील हवामान बदलांमुळं हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळं विविध प्रकारचे अनिष्ट परिणाम होत आहेत. हिमनद्या (Himalayan Glaciers) वितळणं थांबल्यास एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम यांचं संशोधन अलिकडंच विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालं. एका दशकापेक्षा जास्त काळापासून ते हिमालयीन हिमनद्यांवरील हवामान बदलाच्या परिणामांचा शोध घेत आहेत. "हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी" च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळं हिम नद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले.

याचा काय परिणाम होईल

प्राध्यापक फारूक आझम म्हणाले की, हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं. हवामान बदलामुळं या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात लक्षणीयरित्या जाणवत आहे, असेही ते म्हणाले.

अधिक अचूक माहिती समजून घेण्यासाठी संशोधन पथकाने 250 हून अधिक अभ्यासपूर्ण संशोधन पत्रांचे (Research Paper) निष्कर्ष आता एकत्र केले आहेत. हवामान, तापमानवाढ, पर्जन्यवृष्टी बदल आणि हिमनदी संकोचन यांच्यातील संबंधांविषयी माहिती घेतली जात आहे. अमेरिकेच्या प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट, या पेपरचे सह-लेखक जेफ कारगेल म्हणाले की, सर्व संशोधन पत्रांच्या निष्कर्षावरून या समस्येवर मार्ग काढण्यासाठी काही उपाय समोर येऊ शकतात.

हे वाचा - कोरोना टेस्ट आली अंगाशी! सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक; पाहा पुढे काय घडलं

हवामानातील विविधतेवरील पर्वतांची भूमिका

उत्तर ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जोसेफ शिया म्हणाले की, हवामानातील फरक निश्चित करण्यात पर्वतांची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्य पर्वतरांगा या आजूबाजुच्या परिसराची खरंतर सेवा करतात. पावसाळा आणि हिवाळ्यातील वादळांमुळे निर्माण झालेला हवेतील ओलावा नियंत्रित करतात.

First published:
top videos

    Tags: Himachal pradesh, IIT