Home /News /national /

IIT प्रोफेसरने तयार केलं 5 सेकंदात कोरोनाचं निदान करणारं सॉफ्टवेअर

IIT प्रोफेसरने तयार केलं 5 सेकंदात कोरोनाचं निदान करणारं सॉफ्टवेअर

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये यावर लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे.

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणं आणि त्यांचे निदान कमीत कमी वेळेत होणं. आता आयआयटी रुर्कीच्या एका प्राध्यापकांनी कोरोना झालाय की नाही याचं निदान 5 सेकंदात होणारं सॉफ्टवेअर तयार केल्याचा दावा केला आहे. प्राध्यापकांनी सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. आता या सॉफ्टवेअरच्या चाचणीसाठी आयसीएमआरकडे अर्ज केला आहे. हे सॉफ्टवेअर विकसित कऱण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आयआयटी रुर्कीमध्ये सिव्हिल इंजीनिअरिंग विभागात प्राध्यापक असलेल्या कमल जैन यांनी दावा केला आहे की, या सॉफ्टवेअरमुळे तपासणीचा खर्च कमी होईल. इतकंच नाही तर निरोगी लोक कोरोनाच्या संपर्कात येण्याचा धोकाही कमी होईल. त्यांच्या या दाव्यावर कोणत्याही लॅबने किंवा आरोग्य संस्थेनं मत नोंदवलेलं नाही. कमल जैन म्हणाले की, कोरोना, न्युमोनिया आणि ताप आलेल्या रुग्णांच्या एक्स रेसह 60 हजार एक्स रेंचे विश्लेषण केले. त्यानंतर डेटाबेस विकसित करून या तीनही आजारांमध्ये दिसणारे बदल नोंदवले. अमेरिकेच्या एनआयएच क्लिनिकल सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या एक्स रे डेटाबेसचाही वापर करण्यात आल्याचं जैन यांनी सांगितलं. हे वाचा : Coronavirus : साबण की सॅनिटायझर, व्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य? सॉफ्टवेअरचा वापर करून डॉक्टर लोकांच्या एक्स रे चे फोटो अपलोड करू शकतात. यात रुग्णामध्ये न्यूमोनियाची लक्षणे आहेत का एवढंच सांगत नाही तर कोरोनामुळे आहे की इतर काही कारण आहे याचीसुद्धा माहिती मिळेल असा दावाही जैन यांनी केला. प्राथमिक तपासणीसाठी या सॉफ्टवेअरची मदत होऊ शकते यानंतर धोकादायक प्रादुर्भाव असेल तर पुढची तपासणी करता येईल असंही कमल जैन म्हणाले. हे वाचा : कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन; घरात बसल्या बसल्या या आजाराने घातला विळखा संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या