Home /News /national /

...तर 4 महिन्यात देशातील कोरोनाबाधितांचा आकडा होणार 1 कोटी! IIScनं वर्तवला अंदाज

...तर 4 महिन्यात देशातील कोरोनाबाधितांचा आकडा होणार 1 कोटी! IIScनं वर्तवला अंदाज

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

IIScच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ट्रेंडनुसार 1 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाची 35 लाख प्रकरणं असतील. म्हणजेच, पुढच्या दीड महिन्यादरम्यान 26 लाख नवीन प्रकरणे उघडकीस येतील.

    नवी दिल्ली, 16 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. यातच आता भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरूने (IISc) एक धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. IIScच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ट्रेंडनुसार 1 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाची 35 लाख प्रकरणं असतील. म्हणजेच, पुढच्या दीड महिन्यादरम्यान 26 लाख नवीन प्रकरणे उघडकीस येतील. सक्रीय रुग्णांची संख्या होणार 10 लाख पार IIScच्या अंदाजानुसार 1 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे सक्रीय रुग्ण 10 लाख असतील. त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. देशात सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान परिस्थितीच सुधार झाल्यास 1 सप्टेंबरपर्यंत देशात 20 लाख एकूण रुग्ण असतील. सध्या देशात एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे. वाचा-24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ नोव्हेंबरपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा होणार 1 कोटी पार टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, IISc ने हा अंदाज कोरोनाच्या ट्रेंडनुसार केला आहे. IISc च्या म्हणण्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत देशात 1 कोटी कोरोना रुग्ण असतील. तर, जानेवारी 2021 पर्यंत देशात खतरनाक व्हायरसमुळे तब्बल 10 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो. वाचा-वॅक्सीन तयार करण्यात पुण्यातील कंपनीला यश! न्यूमोनियावरील लसीला DGCI ची मंजुरी राज्यांचा अंदाज IISc राज्यांच्या अंदाजानुसार सध्याच्या ट्रेंडनुसार 1 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 6.3 लाख, दिल्ली 2.4 लाख, तामिळनाडू 1.6 लाख आणि गुजरातमधील कोरोनाचे रुग्ण 1.8 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. IISc च्या म्हणण्यानुसार जर परिस्थिती अधिकच बिघडली तर मार्चअखेरपर्यंत भारतात कोरोनाची 6.2 कोटी प्रकरणं असतील. या काळात देशात 82 लाख सक्रिय प्रकरणे असू शकतात. तर 28 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. वाचा-औषध घेण्याआधीच दुकानाच्या पायरीवर झाला मृत्यू, कोरोना रिपोर्टनंतर हादरलं शहर
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या