'या' फोटोमध्ये किती वाघ आहे? IFS अधिकाऱ्याचं चॅलेंज घेऊनच दाखवा!

'या' फोटोमध्ये किती वाघ आहे? IFS अधिकाऱ्याचं चॅलेंज घेऊनच दाखवा!

अनेकांना तर या फोटोत काही आढळलं नाही पण ज्यांना समजलं ते चांगलेच अवाक् झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे भलेभले चांगलेच बुचकळ्यात सापडले आहे. सुशांत नंदा यांनी या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे, असं आव्हान केलं आहे. अनेकांना तर या फोटोत काही आढळलं नाही पण ज्यांना समजलं ते चांगलेच अवाक् झाले.

सुशांत नंदा हे नेहमी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर वन्य प्राण्यांबद्दल फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. सोबत त्याबद्दलची चांगली माहितीही देत असतात. अलीकडे त्यांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी रुबाबदार वाघासोबत संपूर्णपणे गवताने वेढलेल्या भागाचा फोटो ट्वीट केल आहे. यात त्यांनी म्हटलं की, 'शिकार करण्यासाठी दिशाभूल करण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे?'

फोटो पाहिल्यानंतर काही जणांनी फोटो हा नीट दिसत नसल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर सुशांत यांनी त्याच परिसरातला आणखी एक फोटो शेअर केला आणि 'आता सांगा किती वाघ आहे?'

हा फोटो अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा होता. काही जणांना तर काहीच आढळून आले नाही. वाघाचा शोध घेण्यासाठी अनेकांनी डोकं लढवलं पण हाती काहीच आलं नाही.  काही जणांनी तर हा फोटोशॉपचा इफेक्ट आहे, असं म्हणून वेळ मारून नेली.

पण, काही हुश्शार ट्वीटर युझर्सनी वाघ शोधूनच काढले. त्यांनी फोटोवर मार्क करून सुशांत यांना पाठवला. तेव्हा, दोन वाघ हे गवतात लपून बसले असल्याचं आढळून आलं.

खरंतर पट्टेदार वाघ आणि गवताचा रंग हा सोनेरी असल्यामुळे वाघ नेमके कुठे बसले आहे, याचा काही नेम लागत नव्हता.

पण, ज्या प्रकारे दोन वाघ हे शिकार करण्यासाठी लपून बसले होते, ते पाहता तिथे कुणी जवळ जावूनही पाहिलं असतं तर लवकर काही कळलं नसतं.

First published: March 15, 2020, 10:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या