मराठी बातम्या /बातम्या /देश /मतदान न करणाऱ्यांना हातपाय बांधून आणा -येडियुरप्पा

मतदान न करणाऱ्यांना हातपाय बांधून आणा -येडियुरप्पा

''आता आराम करण्याची वेळ नाहीये. जर तुम्हाला वाटलं एखादा व्यक्ती मतदान करू शकत नाही तर त्याच्या घरी जा, त्याचे हातपाय बांधा..."

    कर्नाटक, 05 मे : जर कुणी मतदान करण्यासाठी येणार नसेल तर त्याचे हातपाय बांधून आणा, पण मतदान नक्की करा असं वक्तव्य भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी केलंय.

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आखडा आता चांगलाच तापलाय.  किट्टूर इथं झालेल्या प्रचारसभेत येडियुरप्पांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भलताच आदेश त्यांनी देऊन टाकला.

    आता आराम करण्याची वेळ नाहीये. जर तुम्हाला वाटलं एखादा व्यक्ती मतदान करू शकत नाही तर त्याच्या घरी जा, त्याचे हातपाय बांधा आणि त्याला मतदान केंद्रावर आणून महंतेश डोड्डागौडर या उमेदवारासाठी मतदान करण्यास सांगा असा अजब आदेशच येडियुरप्पा यांनी दिली.

    First published:
    top videos