तिरूअनंतपुरम, 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. दरम्यान, 114 जागांकरता होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील 14 जागांवर आज मतदान होत आहे. आसाम, केरळ, बिहार, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये देखील मतदान होत आहे. तिरूअनंतपुरम या ठिकाणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ‘बटन कोणतंही दाबा, मत भाजपलाच जातं’ असा आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईव्हीएमबाबत तक्रार येण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएमबद्दल तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. राज्यात देखील कोल्हापूरमध्ये सकाळी ईव्हीमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला होता.
Kerala: Senior Congress leader and Thiruvananthapuram candidate Shashi Tharoor casts his vote at a polling booth in the city. He is up against BJP's Kummanam Rajasekaran and LDF’s C Divakaran. #LokSabhaElections2019pic.twitter.com/zJwnJ3nALC
तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील सर्व 26 जागा तर केरळ येथील सर्व 20 जागांवर मतदान होणार आहे. यासोबत आसाममध्ये 4 जागा, बिहारमध्ये 5 जागा, छत्तीसगडमध्ये 7 जागा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 14 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10 जागा, पश्चिम बंगालमध्ये 5 जागा, गोव्यात 2 आणि दादर नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येक 1-1 जागेचा समावेश आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये देखील मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर देखील लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राज्यात जेष्ठ नागरिकांनी देखील यावेळी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचा हा उत्साह तरूणांना देखील लाजवेल असा होता.
VIDEO: कॉलर स्टाईलबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचं डॅशिंग उत्तर