मराठी बातम्या /बातम्या /देश /

पोलिसांबद्दलच तक्रार करायची आहे? फक्त email किंवा Whatsapp मेसेज पुरेसा आहे; आयुक्तांची कल्पना

पोलिसांबद्दलच तक्रार करायची आहे? फक्त email किंवा Whatsapp मेसेज पुरेसा आहे; आयुक्तांची कल्पना

सामान्य नागरिक म्हणन पोलीस स्टेशनमध्ये तुम्हालाही काही वाईट अनुभव आला आहे का? जोधपूरच्या पोलीस आयुक्तांनी (jodhpur police) त्यावर शोधलाय उपाय

सामान्य नागरिक म्हणन पोलीस स्टेशनमध्ये तुम्हालाही काही वाईट अनुभव आला आहे का? जोधपूरच्या पोलीस आयुक्तांनी (jodhpur police) त्यावर शोधलाय उपाय

सामान्य नागरिक म्हणन पोलीस स्टेशनमध्ये तुम्हालाही काही वाईट अनुभव आला आहे का? जोधपूरच्या पोलीस आयुक्तांनी (jodhpur police) त्यावर शोधलाय उपाय

जोधपूर, 31 डिसेंबर :  भ्रष्ट आणि निष्काळजी पोलिस कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी जोधपूर पोलिस आयुक्तांनी (Jodhpur Police Commissioner) एक  (Whatsapp) आणि मेल आयडी (Email) जाहीर केला आहे. याद्वारे सामान्य नागरिक पोलिस कर्मचाऱ्यांबाबत थेट तक्रारी करु शकतात. जोधपूर (Jodhpur) परिसरात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर योग्य तपास न करणे किंवा न्याय न दिल्या जाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. पोलिसांचा हा भेदभाव तसेच गुन्हेगारांशी असलेल्या कथित संबंधांविरोधात जोधपूर पोलिस आयुक्तालयाने  कडक कारवाई सुरु केली आहे. जोधपूरमधील सामान्य नागरिक आता अशा पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात व्हॉटसअॅप किंवा ई-मेलव्दारे तक्रार करु शकणार आहेत. यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. जोधपूर पोलिस आयुक्तांनी एक व्हॉटसअॅप क्रमांक आणि ईमेल आयडी प्रसिध्द केला असून त्याव्दारे पोलिस कर्मचाऱ्यांविषयीची तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. यामध्ये तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. या व्हॉटसअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडीवर करु शकता तक्रार जोधपूर पोलिस आयुक्त जोस मोहन यांनी सामान्य नागरिकांना पोलिसांच्या कामावर समाधानी नसल्यास तक्रार दाखल करण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी त्यांनी एक व्हॉटसअॅप क्रमांक जाहिर केला आहे. जोधपूरमधील नागरिक 9530440045 या क्रमांकावर पोलिस कर्मचारी काम करत नसतील किंवा त्यांच्यासंदर्भात अन्य काही तक्रारी असतील तर पोस्ट करु शकतात. याबरोबरच त्यांनी एक ई-मेल आयडी जाहिर केला आहे. cpjodhpurvig@gmail .com या ईमेलवर देखील नागरिक तक्रारी दाखल करु शकतात. पारदर्शक कारभारासाठी पोलिस आयुक्तांनी केली ही व्यवस्था हे उल्लेखनीय आहे की सामान्य नागरिक पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) जाऊन तक्रार दाखल करतात. परंतु, अशा वेळी पोलिस चौकशीचा बडगा उगारतात आणि कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराकडे पैशांची मागणी करतात. या पार्श्वभूमीवर जोधपूर पोलिस आयुक्तांनी जोधपूर शहरात स्वच्छ आणि चांगल्या पोलिस दलासाठी ही व्यवस्था केली आहे. जोधपूर हे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांचे गृहक्षेत्र राज्यातील जवळपास सर्वच भागात पोलिसांच्या कार्यशैलीबाबत असंतोष आहे. मात्र जोधपूरमध्ये असे प्रकार घडण्याचे प्रमाण अधिक आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Ashok Gahelot) यांचे जोधपूर हे गृहक्षेत्र असल्याने पोलिस जरा जास्तच दक्षता घेताना दिसत आहेत.
First published:

पुढील बातम्या