मराठी बातम्या /बातम्या /देश /

निवडणूक नीतितज्ज्ञ प्रशांत किशोर यांचं भाजपला थेट आव्हान; म्हणाले 'हे Tweet सेव्ह करून ठेवा'

निवडणूक नीतितज्ज्ञ प्रशांत किशोर यांचं भाजपला थेट आव्हान; म्हणाले 'हे Tweet सेव्ह करून ठेवा'

West Bengal Election: 'भाजपने बंगालमध्ये दुहेरी आकड्यापर्यंत जरी मजल मारली तरी मी Twitter संन्यास घेईन.'

West Bengal Election: 'भाजपने बंगालमध्ये दुहेरी आकड्यापर्यंत जरी मजल मारली तरी मी Twitter संन्यास घेईन.'

West Bengal Election: 'भाजपने बंगालमध्ये दुहेरी आकड्यापर्यंत जरी मजल मारली तरी मी Twitter संन्यास घेईन.'

  • Published by:  News18 Desk
कोलकत्ता, 21 डिसेंबर: पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2021) होणार आहेत. त्यामुळं येथील राजकीय हालचालींना (Political Movements) आता वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यात (West bengal) म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. भाजप (BJP) याठिकाणी बहुमतानं निवडून येईल आणि ममता बॅनर्जीला ऐतिहासिक पराभवाला सामोरं जावं लागेल. मात्र तृणमूल कॉंग्रेसचे (Trinamool congress) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपच्या या वक्तव्याला काल्पनिक म्हटलं आहे. तसेच भाजपनं जर या निवडणूकीत दुहेरी आकडा पार केला तर मी ट्विटर (Twitter) सोडेल, असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे. प्रशांत किशोर यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रसारमाध्यमांचा एक गट भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहे, यावरून लक्षात येतं की भाजप दुहेरी आकड्यासाठी संघर्ष करीत आहे. भाजपनं जर बंगालमध्ये चांगली कामगिरी केली, तर मी ट्विटर सोडेल. प्रशांत किशोर यांच्या या ट्विटला भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.  त्यांनी म्हटलं की, सध्या बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरू आहे. येथे भाजपचं सरकार निवडून आलं तर, देश एका निवडणूक रणनीतिकाराला गमवेल. बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपासाठी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकणं फार महत्त्वाचं आहे. यामुळंच भाजपचे प्रमुख नेते सतत पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर जात आहेत. अलिकडेच अमित शहा पश्चिम बंगाल दौर्‍यावर गेले होते. यावेळी त्यांनी अनेक  कार्यक्रमात सहभाग घेतला. या दौऱ्या दरम्यान अमित शहा म्हणाले की, बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.
First published:

Tags: BJP, West bengal

पुढील बातम्या