नवी दिल्ली 9 ऑगस्ट: लोकसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसला लागलेलं ग्रहण अजूनही सुटलेलं दिसत नाही. गेली काही महिने काँग्रेसला सतत हादरे बसत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पक्षाला घरचा आहेत दिला आहे. सोनिया गांधी (Sonia Gndhi) यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाचं ओझं आता टाकू नये. राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची इच्छा नसेल तर पक्षाने नव्या अध्यक्षांचा शोध घ्यावा असं मत त्यांनी ‘PTI’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.
थरूर म्हणाले, काँग्रेस पक्षाबद्दल लोकांच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षांची गरज आहे. आपण सोनिया गांधी यांच्यावर किती काळ ओझं टाकणार आहोत. जास्त ओझं टाकणं योग्य नाही. राहुल गांधी यांच्यामध्ये अध्यक्षपद सांभाळण्याची पूर्ण क्षमता आहे. ते त्या पदासाठी पात्र आहेत. मात्र त्यांची इच्छा नसेल तर काँग्रेस पक्षाने नवा अध्यक्ष शोधण्यासाठी सुरुवात केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019ला काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्षपद सांभाळं होतं. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केलं. दीर्घकाळ सोनिया गांधींवर काँग्रेसचं ओझं टाकणं हे अन्याय करणारं ठरेल असंही ते म्हणाले.
सर्व विषयात 90 गुण मात्र गणितात पडले 2; पुनर्तपासणीत मिळाले 100 पैकी 100
लोकसभेतल्या पराभवानंतर जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही महिने ज्येष्ठ नेत्यांच्या समितीने कारभार पाहिला. मात्र नंतर परिस्थिती सावरण्यासाठी सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली. मात्र पक्षाला अजुनही दिशा मिळू शकली नाही असं मत राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत.
Congress needs to expedite process of finding full-term president to arrest perception of being 'rudderless', 'adrift': Shashi Tharoor to PTI
— Press Trust of India (@PTI_News) August 9, 2020
मध्य प्रदेशातली हातात आलेलं राज्य गेलं. राजस्थानमध्येही सत्ता डळमळीत झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला हादरे बसत असून पक्षाला आता कसं सावरायचं असा प्रश्न निर्माण झाल्याची भावना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. तर सर्व नेत्यांनी विनंती केल्यानंतरही राहुल गांधी हे अजुनही पक्षाचं अध्यक्षपद स्विकारण्यास तयार नाहीत.