'नरेंद्र मोदींची हवा नाही तर विरोधक एकत्र का येत आहेत?'

'भाजपविरुद्ध एकत्र येणं हे स्मार्ट राजकारण आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. साधणं नाहीत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र येत भाजपविरुद्ध लढावं लागतंय.'

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 11:01 PM IST

'नरेंद्र मोदींची हवा नाही तर विरोधक एकत्र का येत आहेत?'

नवी दिल्ली 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालं असलं तरी दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचं एकमेकांचं मन वळवणं सुरुच आहे. काँग्रेसशी आघाडी करावी असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतं तर काँग्रेस अहंकारी असल्याचा आरोप आपने केलाय. राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी ट्विट करुन आज एकमेकांवर टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा नाही तर काँग्रेस आणि आप का एकत्र येण्यासाठी आटापीटा करत आहेत असा सवाल भाजपने विचारला आहे.CNN News18 च्या #Viewpoint या कार्यक्रमात भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंग यांनी हा सवाल करत काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी हे स्मार्ट राजकारण असल्याचा दावा केला. या मुद्यावर दोनही प्रवक्त्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती.


Loading...


काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा म्हणाले, काँग्रेसला आघाडी हवी आहे पण आप तयार नाही  आघाडी झाली तर दिल्लीमधून भाजपचा सफाया होईल. राहुल गांधी यांनीही तेच सांगितलं आहे.तर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनशाम तिवारी म्हणाले, देशाला नवा पंतप्रधान पाहिजे आहे. आता जरी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष वेगवेगळे लढत असले तरी निवडणुकीनंतर विरोधीपक्ष एकत्र येऊन सरकार बनवतील.भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंग म्हणाल्या, जहाँ मिले मुलायम और कांशीराम, हवा मे उड गयै जय श्रीराम असं उत्तर प्रदेशात ऐकेकाळी म्हटलं जात होतं, मात्र नंतर कोण हवेत उडालं हे जगाला माहित आहे. मोदींची हवा नाही तर विरोधक एकत्र का येताहेत असा सवालही त्यांनी केला.तर ते स्मार्ट राजकारण आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. साधणं नाहीत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र येत भाजपविरुद्ध लढावं लागतंय असं संजय झा म्हणाले. भाजप इलेक्ट्रोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसा गोळा करत असल्याचं ते म्हणाले. तर हा काळा नाही तर चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा असल्याचं अनिला सिंग म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...