Home /News /national /

'...मग जय श्रीरामच्या घोषणा पाकिस्तानमध्ये द्यायच्या का?' अमित शहांचा ममतांवर प्रहार

'...मग जय श्रीरामच्या घोषणा पाकिस्तानमध्ये द्यायच्या का?' अमित शहांचा ममतांवर प्रहार

पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीचं रण आता तापत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या रणधुमाळीत गुरुवारी उडी घेतली.

  कूचबिहार (पश्चिम बंगाल), 11 फेब्रुवारी : पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीचं रण आता तापत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या रणधुमाळीत गुरुवारी उडी घेतली. कुचबिहारमध्ये (Coochbehar) झालेल्या सभेत अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार टीका केली. पाकिस्तानात घोषणा देणार का? बंगाल विधानसभेच्या निवडणुका संपेपर्यंत ममता बॅनर्जी देखील 'जय श्रीराम' म्हणू लागतील असा दावा अमित शहांनी यावेळी केला. ‘फक्त एका समुदायाची मतं मिळवण्यासाठी ममता असं वागत आहेत. बंगालमध्ये जय श्रीरामची घोषणा देणार नाही तर मग पाकिस्तानमध्ये ती घोषणा द्यायची का?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. जय श्रीराम ही घोषणा देणं म्हणजे जणू गुन्हा आहे, असं वातावरण त्यांनी (ममता बॅनर्जी) निर्माण केलं आहे. त्यांना ही घोषणा अपमानास्पद का वाटते, याची आम्हाला माहिती हवी आहे, अशी टीका शहा यांनी यावेळी केली. ‘ही निवडणूक ऐतिहासिक’ “ममता बॅनर्जी गुंडांच्या जीवावर बंगालची निवडणूक जिंकतात. यंदा ममता स्वत:ची जागा देखील वाचवू शकणार नाहीत. ही निवडणूक ऐतिहासिक असेल. तुमच्या अट्टल गुंडांचा सामना माझा भाजपाचा बुथ कार्यकर्ता करणार आहे. ममता दीदी तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही, आता परिवर्तन करायचं हा निर्धार बंगालच्या जनतेनं केला आहे,’’ असे शहा यांनी यावेळी सुनावले.

  (वाचा - तुम्हाला माहित आहे 'नरेंद्र मोदी' या नावाचा फुलफॉर्म? मोदी म्हणतात...)

  ‘भाच्याला मुख्यमंत्री करणार’ “देशातील गरीब आणि गरजवंतांसाठी मोदी सरकारनं 115 योजना सुरु केल्या आहेत. ममता दीदींनी या योजना अडवल्या आहेत. मोदी सरकार गरिबांसाठी काम करत आहे. तर ममता दीदी या फक्त आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करण्यासाठी काम करत आहेत, असा आरोपही शहा यांनी या भाषणात केला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Amit Shah, Mamata banerjee, West bengal

  पुढील बातम्या