Mission Paani : सावध व्हा, पुढच्या 30 वर्षात संपणार या राज्यांमधलं पाणी?

Mission Paani : सावध व्हा, पुढच्या 30 वर्षात संपणार या राज्यांमधलं पाणी?

पावसाच्या धावणाऱ्या पाण्याला रांगायला लावणं, रांगणाऱ्या पाण्याला थांबवणं आणि थांबणारं पाणी मुरवणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली 26 ऑगस्ट : भारतात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. मात्र त्या पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही. पावसाचं सगळं पाणी समुद्रात वाहून जातं. हे वाहून जाणारं पाणी जर जमीनीत मुरवलं नाही तर देशावर जलसंकट निर्माण होणार आहे. या संकटाची झलक आत्ताच देशातल्या अनेक भागात बघायला मिळतेय. वेळीच सावध होत उपाययोजना केल्या नाहीत तर 2050 पर्यंत देशातल्या महत्त्वाच्या राज्यांमधलं पाणी संपून जाणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. महाराष्ट्र, हरियाणा आणि तमिळनाडूमध्ये तातडीने उपाय योजनांची गरज असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलंय.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तिथे पाण्याची टंचाई फारशी नाही. मात्र मराठवाड्यात अतिशय भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या जास्त बातम्या मराठवाडा आणि विदर्भातूनच येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यात पाण्याची मागणी तब्बल 283 टक्क्यांनी वाढल्याचं प्रशासनाने सांगितलंय. तर 10,506 वाड्या वस्त्यांमध्ये आणि 4,920 खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे.

VIDEO: मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी धनंजय मुंडेंचं वैद्यनाथाला साकडं

तामिळनाडू

तामिळनाडूतली परिस्थिती अतिशय भीषण आहे. राज्याची राजधानी असलेल्या चेन्नई शहरातल्या आणि परिसरातल्या भूगर्भातली पाण्याची पातळी निच्चांकी स्तरावर पोहोचली असून अनेक भागातलं पाणी आटून गेलंय. गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूतल्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाई आहे. तामिळनाडूत हा परतीचा पाऊस जास्त पडतो. पण त्यानेही हुलकावणी द्यायला सुरूवात केलीय. जमीनीतच पाणी नसल्यामुळे पाणी आणायचं तरी कसं असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. कोयंबतूरच्या सेल्व्हा चिंतामणी लेकमध्ये तर पाणी आटल्याने मासे मरून पडले आहेत. यावर्षी चेन्नई शहराला रेल्वेने पाणीपुरवढा करावा लागला होता.

काँग्रेस काय करणार 'महापर्दाफाश'? जनतेनेच पोल खोलली; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

हरियाना

दुध दुपत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हरियानात गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची पातळी झपाट्याने खाली जातेय. उपग्रहाने केलेल्या पाहणीत या लहानशा राज्यात तब्बल 12 डार्क झोन्स तयार झाले आहेत. या भागातल्या भुगर्भातली पाणी पातळी कमालीची घटल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. पावसाच्या धावणाऱ्या पाण्याला रांगायला लावणं, रांगणाऱ्या पाण्याला थांबवणं आणि थांबणारं पाणी मुरवणं आवश्यक असल्याचं  मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ

सावध व्हा!

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की जगभरातील किमान 2 अब्ज लोकांना दुषित पाण्याचे स्त्रोत वापरणे भाग पडते आहे आणि त्या सर्वांना दुषित पाण्याशी संबंधित आजार होण्याचा सर्वात जास्त धोका आहे. फार पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की शुद्ध पाणी मिळणे हा जीवन जगण्याच्या हक्कांचा एक भाग आहे. घटनेच्या अनुच्छेद 21 मध्ये नागरिकांचा हा हक्क मान्य केला गेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत त्या हक्काला काहीही अर्थ नाही. न्यायाधीश पसायत यांनी सांगितलं की, 'आपल्या देशात, 90 च्या दशकात ओरिसामधील एका अहवालावर आधारित मी एक निर्णय दिला होता ज्यात असे म्हटले होते की लोक जे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत ते आंघोळ करण्यासाठी देखील योग्य नाही, कारण त्यामुळे त्वचेचे विकार उद्भवू लागले आहेत'.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2019, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading