News18 Lokmat

गरज लागली तर अमेरिकेच्या तज्ञांकडून मनोहर पर्रीकरांवर होणार उपचार

भाजपतर्फे आणि केंद्र सरकारकडून जेष्ठ मंत्री नितीन गडकरी त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. पण गरज लागली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अमेरिकेतल्या डॉक्टर्सना बोलावलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 12:04 PM IST

गरज लागली तर अमेरिकेच्या तज्ञांकडून मनोहर पर्रीकरांवर होणार उपचार

20 फेब्रुवारी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. भाजपतर्फे आणि केंद्र सरकारकडून जेष्ठ मंत्री नितीन गडकरी त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. पण गरज लागली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अमेरिकेतल्या डॉक्टर्सना बोलावलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या दरम्यान पंतप्रधान कार्यालय सतत लिलावती रुग्णालयाच्या संपर्कात आहे. सर्व अपडेट्स पंतप्रधानांना कळवले जातायेत. आता सगळं देवाच्या हाती आहे. त्यांना अमेरिकेला न्यावं लागलं तरी चालेल, असं खुद्द पंतप्रधानच म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रविवारी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. मनोहर पर्रीकरांचा आजार बरा होईल असा विश्वास सर्वांनाच आहे. त्यामुळे पर्रीकरांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष लक्ष ठेवून आहेत.

अमेरिकेचं आरोग्य तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. त्यातून स्वादूपिंडाशीसंबंधित आजार बरे होऊ शकतात. त्यामुळे भाजप आणि केंद्र सरकारकडून पर्रीकरांना बरं करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. लागलं तर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही हलवण्यात येऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृती संबंधी त्यांच्या कुटुंबीयांची परवाणगी घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पर्रीकर यांनी यापुर्वी संरक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर ते फायटरही आहेत. देशभर त्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे ते पुन्हा बरे होऊन पूर्वीसारखेच राज्याचे नेतृत्व ते करतील, अशी चर्चा भाजपच्या आमदारांमध्येही सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 08:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...