• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • वेगळ्या धर्मातल्या सज्ञान व्यक्तींनी विवाह केल्यास त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आई-वडिलांना नाही, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल

वेगळ्या धर्मातल्या सज्ञान व्यक्तींनी विवाह केल्यास त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आई-वडिलांना नाही, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल

या विवाहित जोडप्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली, तर पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायला हवं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

  • Share this:
अलाहाबाद, 17 सप्टेंबर: दोन वेगवेगळ्या धर्मांतल्या सज्ञान युवक-युवतीने विवाह केला, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांच्या आई-वडिलांनाही राहत नाही, असं अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad Highcourt) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. कोर्टाने आपल्या निकालात स्पष्टपणे तशी टिप्पणी केली असून, या विवाहित जोडप्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली, तर पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायला हवं, असंही कोर्टाने म्हटलं आहे. न्या. एम. के. गुप्ता आणि न्या. दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. शिफा हसन (Shifa Hasan) नावाच्या एका मुस्लिम महिलेने (Muslim) एका हिंदू तरुणाशी विवाह केला. त्यानंतर त्या महिलेने हिंदू धर्म (Hindu Religion) स्वीकारण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यातून रिपोर्ट मागवला. त्यानुसार पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यात पोलिसांनी असं सांगितलं की, संबंधित तरुणाच्या वडिलांना हा विवाह मान्य नाही. तसंच, मुलीचे कुटुंबीयही या निर्णयाच्या विरोधात आहेत.

देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

 त्यानंतर आपल्या आणि पतीच्या जिवाला धोका असल्याची जाणीव शिफाला झाली. त्यामुळे तिने या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली. त्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनात कोणीही हस्तक्षेप न करण्याचे आदेश दिले. तसंच, पोलिसांनी त्यांना संरक्षण पुरवावं, असंही कोर्टाने सांगितलं. सज्ञान व्यक्तींना स्वतःचं जीवन स्वतःच्या विचारानुसार आणि स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे.

कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

 शिफाच्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने सांगितलं, की एका सज्ञान व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. सज्ञान मुलगा किंवा सज्ञान मुलीची निवड अन्य कोणी व्यक्ती चुकीची ठरवू शकत नाही. तसंच, त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या जीवनात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकारही कोणालाही नाही.

Delhi-Mumbai Express-Way नितीन गडकरींची कार धावली 170 च्या स्पीडनं, चहाचाही घेतला आनंद; Watch Video

 अलाहाबाद हायकोर्टाचा हा निकाल सद्यस्थितीत खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्याच्या युवकांमध्ये स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडण्याचं प्रमाण मोठं आहे. बऱ्याचदा त्यात एकमेकांचा धर्म किंवा जात याकडे पाहिलं जात नाही. अशा युवकांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध होतो. काही युवक त्या विरोधाला शरण जातात, तर काही जण मात्र संघर्ष करतात; मात्र अशा युवकांचे विवाह झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करण्याचे बरेच प्रकार होतात. या पार्श्वभूमीवर, कोर्टाचा हा निकाल परिणामकारक ठरू शकेल.
Published by:Pooja Vichare
First published: