...म्हणून प्रियांकांनी गंगा यात्रा केली आणि पाणीही प्यायल्या : गडकरी

...म्हणून प्रियांकांनी गंगा यात्रा केली आणि पाणीही प्यायल्या : गडकरी

...तर प्रियांका गांधी गंगेचं पाणी प्यायल्या असत्या का? गडकरींचा प्रश्न

  • Share this:

नागपूर, 25 मार्च : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या गंगा यात्रेवर टीका केली आहे. आमच्या सरकारने जर गंगा जलमार्ग तयार केला नसता तर त्यांना गंगा यात्रा करता आली असती का ? असा प्रश्नही गडकरी यांनी विचारला आहे.

प्रियांका गांधी यांनी 140 किमीच्या गंगा यात्रेला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्यावरुनच प्रियांका गांधी यांच्यावर गडकरींनी टीका केली.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, प्रयागराज ते वाराणसी जलमार्ग बांधला नसता तर प्रियांका गांधींची सांची की बात झाली असती का? प्रियांका गांधी गंगा नदीचं पाणीही प्यायल्या, इतकं ते स्वच्छ आहे. त्यांच्या युपीए सरकारच्या काळात असं काही केलं का? असा प्रश्न गडकरींनी विचारला.

मार्च 2020 पर्यंत गंगा नदी 100 टक्के शुद्ध होईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. गंगेत पुन्हा डॉल्फिन मासे दिसायला लागले आहेत. तर प्रयागराजच्या काठावर सायबेरियन पक्षीही पहायला मिळाले. याशिवाय कासवांची संख्याही वाढली असल्याचे नितिन गडकरी यांनी सांगितले.

नमानी गंगे योजनेंतर्गत 26 हजार कोटींचे 285 प्रकल्प सुरु आहेत. फक्त गंगा नदीच नाही तर यमुना, काली या नद्यांसह 40 नद्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. यातील 30 टक्के प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती नितिन गडकरी यांनी दिली.

First published: March 25, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading