मराठी बातम्या /बातम्या /देश /

हिंदू मुस्लिमांचा DNA एकच असेल तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा का करता? दिग्विजय सिंहांचा सरसंघचालकांना सवाल

हिंदू मुस्लिमांचा DNA एकच असेल तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा का करता? दिग्विजय सिंहांचा सरसंघचालकांना सवाल

हिंदु आणि मुस्लिम यांचा डीएनए एकच असेल, तर मग धर्मपरिवर्तनाला विरोध करणारा कायदा कशासाठी करता, असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

  • Published by:  desk news

भोपाळ, 8 जुलै : हिंदू आणि मुस्लिम (Hindu and Muslim) यांचा डीएनए (DNA) एकच असेल, तर मग धर्मपरिवर्तनाला विरोध करणारा कायदा (Anti Love-Jihad law) कशासाठी करता, असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए (DNA) एकच असून मॉब लिंचिंग धर्मविरोधी असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर दिग्विजय सिंह यांनी टीका करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वक्तव्यात आणि कृतीत फरक असल्याची टीका केली आहे.

काय म्हणाले दिग्विजय सिंह

जर हिंदू आणि मुस्लिम यांचा डीएनए एकच असेल, तर धर्मपरिवर्तनाविरोधी कायदा का करता, असा सवाल दिग्विजय सिंहांनी केला आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या विधानानुसार त्यांचा आणि असादुद्दिन ओवेसी यांचा डीएनए एकच आहे, असं म्हणायचं आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. दोन्ही धर्मियांचा डीएनए एकच असेल, तर लव्ह जिहादविरोधात कायदा का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. मध्यप्रदेशातील सीहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंहांनी हे सवाल उपस्थित केले.

भाजपची टीका

दिग्विजय सिंह हे फुटिरतावादी विचारांचे असल्याची टीका मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. सरसंघचालकांचं वक्तव्य हे राष्ट्रीय एकतेच्या आणि एकात्मतेच्या भावनेतून करण्यात आलं होतं. मात्र दिग्विजय सिंह दोन धर्मात फूट पाडणारं वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हे वाचा - शपथ घेतल्याच्या काही तासात ज्योतिरादित्य शिंदेंच्या फेसबुकवरुन मोदींविरोधात गरळ

दिग्विजय यांचं टीकासत्र सुरूच

सरसंघचालकांच्या या विधानापूर्वीही दिग्विजय सिंहांनी याच मुद्द्यावरून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून निवडणुकीत ते एकमेकांसाठी पोषक काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मोहन भागवत आपले हे विचार शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पटवून देऊ शकतील काय, असा सवालही त्यांनी ट्विटरवरून उपस्थित केला होता.

First published:

Tags: Congress, Rss mohan bhagwat