शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार कॅशबॅक; दुकानाची वादग्रस्त ऑफर

शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार कॅशबॅक; दुकानाची वादग्रस्त ऑफर

या वादग्रस्त जाहिरातीवर आक्षेप घेत एका वकिलाने याविरोधात याचिका केली आहे

  • Share this:

थिरुवनंतरुपुरम, 18 ऑगस्ट : ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेते अनेक ऑफर्स देतात. सध्या कोरोना काळात अशाच एका ऑफर्सची चर्चा आहे आणि ही ऑफर म्हणजे शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना (coronavirus) झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक (cashback offer) मिळणार. या वादग्रस्त जाहिरातीमुळे दुकानात ग्राहकांची गर्दी तर झाली मात्र आता या दुकानावर कारवाई करण्यात येत आहे.

केरळमध्ये (kerala) इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानाने अशी विचित्र ऑफर 15 ते 30 ऑगस्टसाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरही याची जाहिरात देण्यात आली आहे. या वादग्रस्त जाहिरातीवर आक्षेप घेत एका वकिलाने याविरोधात याचिका केली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं याकडे लक्ष वेधलं आहे.

वकिल बिनू पुलिक्काक्कांदम यांनी जाहिराताविरोधात याचिका केली आहे. कॅशबॅकच्या ऑफरमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णदेखील आपला आजार लपवून दुकानात खरेदीसाठी जाऊ शकतात आणि नंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दाखवून कॅशबॅक मागू शकतात ही जाहिरात बेकायदेशीर आणि दंडनीय असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

हे वाचा - एका छोट्या पॅकेटची मोठी कमाल, कोरोनापासून करतो बचाव; दाव्याबाबत FACT CHECK

याचिकेत त्यांनी म्हटलं आहे, "ज्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, असे कोरोना रुग्ण पैसे मिळवण्यासाठी दुकानात जाऊ शकतात. संसर्गजन्य असा आजार जाणीवपूर्वक पसरवला जातो आहे. आपल्या फायद्यासाठी व्यावसायिक आपली सामाजिक जबाबदारी विसरत आहेत. आयपीसी कलम 269, माहिती तंत्रज्ञान कायदा 2020, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 89 आणि केरळ महापालिका कायद्यातील आरोग्य नियमांचं हे उल्लंघन आहे. त्यांनी गंभीर असा गुन्हा केला आहे"

केरळमध्ये कोरोनापासून बचावासाठी कठोर असे नियम लागू करण्यात आले आहे. एका दुकानात एकावेळी 20 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच पोलीस या दुकानात दाखल झाले. याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे.

हे वाचा - राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

केरळमध्येच भारतातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. 17 ऑगस्टला 1,725 रुग्णांची नोंद झाली तर 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: August 18, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading