'भाजप निवडून आली तर भारत होईल हिंदू पाकिस्तान'

'भाजप निवडून आली तर भारत होईल हिंदू पाकिस्तान'

त्यांच्याकडे भारतीय संविधान पूर्णपणे खोडून काढून नव्याने लिहिण्याच्या सर्व कल्पना तयार आहे

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 12 जुलैः काँग्रेस नेता शशी थरूर यांनी मंगळवारी केलेल्या धक्कादायक विधानामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. '2019 च्या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्ष निवडून आला तर भविष्यात भारत हिंदू पाकिस्तान होईल,' असे मत थरुर यांनी तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले. थरूर पुढे म्हणाले की, 'भाजप नवे संविधान लिहिल, जे भारताला पाकिस्तानसारखा देश होण्यासाठी रस्ता मोकळा करेल. तेव्हा अल्पसंख्यांक जनतेच्या अधिकारांना काही किंमत राहणार नाही.'

'जे भाजप दुसऱ्यांदा निवडून आली तर आपले संविधान संपुष्टात येईल. कारण त्यांच्याकडे भारतीय संविधान पूर्णपणे खोडून काढून नव्याने लिहिण्याच्या सर्व कल्पना तयार आहे. त्यांनी लिहिलेले संविधान हे हिंदू राष्टाला समोर ठेवून बनवण्यात येईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठी लढाई केली नव्हती.'

थरूर यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने या वक्तव्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे माफीनाम्याची मागणी केली आहे. 'शशी थरूर यांच्यावतीने राहुल यांनी माफी मागीतली पाहिजे. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस जबाबदार होती आणि आता पुन्हा एकदा भारताला कमी लेखण्यात आणि देशातील हिंदूंना वाईट दाखवण्याचं काम ते करत आहेत,' असे बीजेपीचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

हेही वाचाः

फेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 10:31 AM IST

ताज्या बातम्या