नवी दिल्ली 15 जुलै: राजस्थानमध्ये काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या बंडानंतर राहुल गांधी यांनी पक्षातल्या नेत्यांना इशार दिला आहे. ज्यांना पक्षात राहायचं नाही त्यांनी पक्षातून चालतं व्हावं असा कडक इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. NSUIच्या कार्यकर्त्यांशी बोलतांना त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. तुमच्यासारख्या तरुणांना पक्षाची दारं कायम उघडी आहेत असंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांचा हा इशारा पक्षातल्या सर्व नाराजांना सूचक इशारा असल्याचं बोललं जात आहे.
सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. त्याआधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे या राहुल गांधींच्या जवळ समजल्या जाणाऱ्या नेत्यानेही भाजपसोबत घरोबा केला होता. त्यामुळे काँग्रेस नाराजांचं मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात होतं.
पण राहुल यांच्या या भाषणानंतर मात्र सचिन पायलट यांचे दोर आता कापले गेले आहेत असं म्हटलं जातं. राहुल गांधी हे तडजोड करण्याच्या भूमिकेत नाहीत असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
कोरोनावर प्रभावी 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, महाराष्ट्राला फायदा
राजस्थानमधल्या राजकीय नाट्याने आता वेगळं वळण घेतलं आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. मला मुख्यमंत्री करा अशी मागणी करणाऱ्या पायलट यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे.
‘फक्त Handsome असून चालत नाही, तर...’ काँग्रेसची सचिन पायलट यांच्यावर बोचरी टीका
फक्त उत्तम इंग्रजी बोलणं, माध्यमांना चांगले बाईट्स देणं आणि देखणं असणं म्हणजेच सर्वकाही नाही. तर तुमच्या मनात देशाबद्दल काय भावना आहेत. तुमची धोरणं, तत्वज्ञान काय आहे, तुमची बांधिलकी कुणासोबत आहे यासगळ्यांचा विचार केला जातो अशी टीकाही त्यांनी केली.
If anybody wants to leave the party they will. It opens the door for young leaders like you, said Rahul Gandhi at an NSUI meeting today: Sources (file pic) pic.twitter.com/jxG0NTgNlO
— ANI (@ANI) July 15, 2020
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याबद्दल काँग्रेसने आता सचिन पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी सर्व 19 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यावर तातडीने उत्तर दण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi