Coronavirus: प्रदूषण वाढल्यास, कोरोना रुग्णांची संख्याही वाढेल; एम्सकडून इशारा

Coronavirus: प्रदूषण वाढल्यास, कोरोना रुग्णांची संख्याही वाढेल; एम्सकडून इशारा

'वायू प्रदूषण जसं-जसं वाढेल, तसं कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ होईल, वायू प्रदूषण वाढल्यास, कोरोना व्हायरस हवेत अधिक काळ ऍक्टिव्ह राहू शकतो, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे'

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Covid 19) आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून भारतातही याचा कहर सुरुच आहे. याचदरम्यान, दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थानचे (AIIMS)संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus)आणि प्रदूषणाबाबत (Air Pollution) इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणात वाढ झाल्यास, त्याचा परिणाम कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुपात दिसू शकतो. दिल्लीत पुन्हा वाढणारा वायू प्रदूषणाचा स्तर पाहता त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लोकांना वायू प्रदूषण आणि कोरोना व्हायरसबाबत सतर्क राहण्यास सांगितलं आहे. वायू प्रदूषण जसं-जसं वाढेल, तसं कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ होईल, असं त्यांनी सांगितलं. वायू प्रदूषण वाढल्यास, कोरोना व्हायरस हवेत अधिक काळ ऍक्टिव्ह राहू शकतो, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे ज्यावेळी लोक श्वास घेतात त्याद्वारे व्हायरस शरीरात जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.

वाचा - अमेरिकेच्या White Houseला धोकादायक ठिकाण का ठरवण्यात आलं?

देश आता अनलॉक होत असल्याने, प्रदूषणाची समस्या पुन्हा एकदा पुढे येत आहे. परंतु जर कोरोना व्हायरस आणि प्रदूषण दोन्ही एकाच वेळी वाढलं, तर सर्वांसाठी मोठी समस्या उत्पन्न होऊ शकते, असंही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

वाचा - कमाल! आता 'बाबा का ढाबा'ची होणार होम डिलिव्हरी, viral videoनंतर Zomatoवर लिस्टेट

वाढतं वायू प्रदूषण पाहता गुलेरिया यांनी, ज्या लोकांना श्वासासंबंधी आजार आहे त्यांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसंच चीन आणि इटलीकडून आलेल्या वृत्तांचा हवाला देत त्यांनी, ज्या ठिकाणी QI 2.5हून अधिक आहे, तेथे कोरोना व्हायरसबाधितांची संख्या 8 ते 9 टक्क्यांनी वाढली असल्याची बाब समोर आल्याचं सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: October 11, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या