Article 370 : युद्ध झालं तर त्याला भारतच जबाबदार; इम्रान खानचा थयथयाट

Article 370 : युद्ध झालं तर त्याला भारतच जबाबदार; इम्रान खानचा थयथयाट

भाजपचे लोक मानसिक रुग्ण आहेत. त्यांना हिंदुत्वाचा विचार थोपवायचा आहे. RSSचं भूत बाटलीतून आता बाहेर आलंय.

  • Share this:

मुझफ्फराबाद 14 ऑगस्ट : केंद्र सरकारने कलम 370 काढून टाकण्याच्या निर्णयाने पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडालीय. पंतप्रधान इम्रान खान यांचा थयथयाट अजुनही कमी झालेला नाही. भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देण्याचं त्यांनी सुरूच ठेवलंय. 14 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुजफ्फराबाद इथं जाऊन भाषण केलं. काश्मीरमधली परिस्थिती बिघडली आहे. या प्रश्नावरून युद्ध झालंच तर त्याला भारतच जबाबदार असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

'काश्मीरच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना अतिरेक्यांबद्दल तळमळ'- मोदी

इम्रान खान म्हणाले, भाजपचे लोक मानसिक रुग्ण आहेत. त्यांना हिंदुत्वाचा विचार थोपवायचा आहे. RSSचं भूत बाटलीतून आता बाहेर आलंय. पूर्वीचा सहिष्णू भारत आता राहिलेला नाही. ही परिस्थिती कुठलंही रुप घेऊ शकते. याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, स्वातंत्र्य दिनी होणार गौरव

काश्मीरच्या प्रश्नावर पाक एकाकी

काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. पाकचा खास मित्र असलेल्या चीन आणि सौदी अरेबियानेही उघडपणे पाठिंबा व्यक्त केला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडलाय. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. काश्मीरचा प्रश्न चिघळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

इम्रान खान यांनी दोन ट्विट करत संघावर टीका केली. संघ हिंदुत्वाची विचासरणी थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काश्मीरमधली परिस्थिती चिघळली असून तिथल्या संचारबंदीला तीच विचारसरणी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काश्मीरमध्ये अत्याचार आणि दडपशाही होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काश्मीरसाठीचं 370वं कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झालाय. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न केले. मात्र त्याला यश आलं नाही. एकाही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. भारतासोबतचे राजकीय संबंध कमी करण्याची घोषणाही पाकिस्तानने केली आहे. तर काश्मीरचा प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून भारताच्या राज्यघटनेनुसारच सर्व काही झाल्याचं भारताने ठामपणे सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या