Home /News /national /

विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय करतात? कुठे ठेवतात मृतदेह? विमान तात्काळ लँड करतात? वाचा सविस्तर

विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय करतात? कुठे ठेवतात मृतदेह? विमान तात्काळ लँड करतात? वाचा सविस्तर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

तुम्हाला जर वाटत असेल की असं काही होण्याची शक्यता अगदी कमी असते, तर थांबा. ब्रेना यांनी सांगितले, की दरवर्षी अशा हजारो घटना घडतात.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : मृत्यू हा कुणालाही सांगून येत नाही. कित्येक वेळा अगदी अनपेक्षितवेळी आणि अनपेक्षित ठिकाणी लोकांचा मृत्यू होतो. मग याला विमानाचाही अपवाद नाही. पण कधी विचार केलाय, की जमीनीपासून हजारो फूट उंचीवर विमान असताना जर कोणाचा मृत्यू (what if someone dies on plane) झाला, तर काय करतात? अशा वेळी इमर्जन्सी लँडिंग करतात, की मृतदेहाला तसंच ठेऊन इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर त्याकडे लक्ष देतात? या प्रश्नांची उत्तरं आम्ही आज देणार आहोत. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या विमान कंपनीतील फ्लाईट अटेंडंट (Flight attendant reveals what happens to dead bodies on plane) ब्रेना यंग यांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला आहे. ‘दी सन’च्या वृत्तानुसार, ब्रेना यांनी एका पॉडकास्टमध्ये याबाबत माहिती दिली. विमानात अचानक कोणाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वात आधी ते त्या व्यक्तीचं सीट सिक्युअर (Secure the location) करतात. विमान जमिनीवर लँड केल्यानंतर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हे केलं जातं. यामुळे प्रवाशाचा मृत्यू (Death on plane) कशामुळे झाला, तो खून होता का याबाबत अधिक स्पष्टपणे तपास होण्यास मदत होते. अर्थात, यामुळे बाकीच्या प्रवाशांनाही आपल्या जागेवरून हलता येत नाही. जोपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा (Police investigation) होत नाही, तोपर्यंत सर्व प्रवाशांना विमानातच बसून रहावं लागतं. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. वाचा : आसामच्या चहाला विक्रमी भाव! 99,999 रुपयांना एक किलो चहा, जाणून घ्या काय आहे खास या नियमामुळे बऱ्याच प्रवाशांचा संतापही होतो. मात्र याचा सर्वात जास्त त्रास होतो तो मृत व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला. कारण घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण होईपर्यंत या व्यक्तीलाही आपली जागा सोडता येत नाही. अशा वेळी मृतदेहाला ब्लँकेटच्या मदतीने झाकून (Flight attendant cover dead bodies with blanket) ठेवण्यात येतं. तुर्की ते रशिया जाणाऱ्या एका विमानात अशीच घटना घडली होती. एका 50 वर्षांच्या महिलेचा विमान प्रवास सुरू झाल्यानंतर 45 मिनिटांमध्येच मृत्यू झाला होता. तपासामध्ये समजले, की या महिलेला मधुमेह होता, आणि विमानात तिच्याकडे इन्सुलिन नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला. मात्र, तोपर्यंत तिच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी हा संपूर्ण प्रवास अगदीच भयावह होता. वाचा : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हनीमूनऐवजी पोहोचले दफनभूमीत तुम्हाला जर वाटत असेल की असं काही होण्याची शक्यता अगदी कमी असते, तर थांबा. ब्रेना यांनी सांगितले, की दरवर्षी अशा हजारो घटना घडतात. विशेष म्हणजे, असं काही झाल्यास विमानातील इतर प्रवाशांना (Death on plane) याबाबत माहिती देण्यात येत नाही. कित्येक वेळा तर शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही याबाबत सांगण्यात येत नाही. अशा मृतदेहाला विमानातील कर्मचारी ‘एचआर’ या टोपण नावाने (nick name of dead bodies in plane) संबोधतात. एचआरचा अर्थ, ह्यूमन रिमेन्स (Human remains) असा होतो. एकंदरीत, दरवर्षी नकळतपणे कित्येक लोक हे मृतदेहांच्या बाजूला बसून प्रवास (Travel in plane with dead body) करतात. प्रवाशांना विमान उतरल्यानंतरच परिस्थितीची कल्पना दिली जाते. एखादी व्यक्ती प्रवासात मरण पावल्यास तिच्या मृतदेहाला सन्मानपूर्वक हाताळणं गरजेचं असतं, असंही ब्रेना यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Airplane, Travel by flight

    पुढील बातम्या