Home /News /national /

Ghazipur : दिल्लीत गाझीपूरच्या मार्केटमध्ये IED स्फोटकं, निष्क्रिय करण्याचं ऑपरेशन सुरु

Ghazipur : दिल्लीत गाझीपूरच्या मार्केटमध्ये IED स्फोटकं, निष्क्रिय करण्याचं ऑपरेशन सुरु

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी एक पीसीआर कॉल आला होता. या फोनवर या स्फोटकांविषयी हिंट देण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : देशाच्या प्रजासत्ताक दिनाला (Republic Day) अवघे काही दिवस शिल्लक असताना राजधानी दिल्लीतून (Delhi) एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. दिल्लीच्या गाझीपूर येथील फुलांच्या (Ghazipur Flower Market) मार्केटमध्ये एक IED स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस (Delhi Police), स्पेशल सेल (Special Cell), दहशवाद विरोधी पथक, बॉम्ब नाशक पथक (NSG) यांच्यासह इतर सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्या. परिसरात जेसीबीच्या साहाय्याने मोठं खड्डं खोदण्यात आलं. त्या खड्ड्यात स्फोटकाला निकामी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं. संबंधित स्फोटकं गाझीपूर येथील मार्केटमध्ये कसे आले, ते कोणी आणले? याचा शोध लावण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी एक पीसीआर कॉल आला होता. या फोनवर या स्फोटकांविषयी हिंट देण्यात आली होती. गाझीपूर परिसरात एक संशयित बॅग आहे, त्यामध्ये बॉम्ब आहे, असं त्या फोनमधून सांगण्यात आलं होतं. या फोननंतर तातडीने पोलीस आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर NSG बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. (गौहर खानचा फोटो काढताना पापाराझींकडून घडलं असं काही, भडकली अभिनेत्री, पाहा VIDEO) सर्व सुरक्षा यंत्रणांनी तपास केला तेव्हा बॅगेत आयईडी स्फोटकं असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एक मोठा खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात स्फोटकं निष्क्रिय करण्याचं काम सुरु झालं. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सगळ्या प्रकारची काळजी घेतली गेली. घटनास्थळापासून सर्व नागरिकांना लांब करण्यात आलं. सुरक्षा यंत्रणांनी परिसराला चारही बाजूने घेरलं आहे. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर बॉम्ब नाशक पथकाला स्फोटकं निकामी करण्यात यश आलं. पथकाकडून आयईडीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या स्फोटकात कोणकोणते रासायनिक पदार्थ टाकण्यात आले आहेत, याबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. दरम्यान, बॉम्ब नाशक पथकाने आईडी स्फोटकं निष्क्रिय केल्याचे पुरावे देखील समोर आले आहेत. याबाबत एक व्हिडीओ 'एएनआय' वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत स्फोटकं निकामी केल्यानंतर हवेत धूर उडताना दिसत आहे. कोणतीही जीवितहानी न होऊ देता एनएसजीने केलेलं हे ऑपरेशन खरंच कौतुकास्पद होतं. या स्फोटकांमागे नेमकं कुणाचा हात आहे, ते अद्याप समोर आलेलं नाही. पण पोलीस लवकरच आरोपींना शोधून काढतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या