सुरक्षा दलाची मोठी कारवाई, जैश-ए-मोहम्मदच्या IED एक्सपर्टसह 3 जण ठार

सुरक्षा दलाची मोठी कारवाई, जैश-ए-मोहम्मदच्या IED एक्सपर्टसह 3 जण ठार

डीजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तीन्ही लोक पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते.

  • Share this:

श्रीनगर, 17 जुलै: कोरोनाचं संकट असताना दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडून सातत्यानं कुरापती सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात शुक्रवारी सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली. कुलगाम सेक्टरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या IED एक्सपर्टसह तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे.

जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तुकडी, सैन्य आणि कुलगाम पोलिसांनी संयुक्त कारवाईत चिम्मर गावात चकमकीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलाला तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.

हे वाचा-BREAKING : अमित शहांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

डीजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तीन्ही लोक पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. मोठा हल्ला करण्याचा त्यांचा डाव सुरक्षा दल आणि पोलिसांनी उधळून लावला आहे.

ठार केलेल्यांमध्ये आयडी एक्सपर्टचा समावेश आहे. त्याला पाकिस्तानी हँडलरकडून थेट सूचना मिळाल्या होत्या. सुरक्षा दलाविरोधात कट रचत होते. मोठा हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा दलानं कारवाई केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 17, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या