इदरीस हसन लतीफ भारताचे पहिले मुस्लीम Air Force Chief; पाकिस्तानला शिकवला होता असा धडा

इदरीस हसन लतीफ भारताचे पहिले मुस्लीम Air Force Chief; पाकिस्तानला शिकवला होता असा धडा

Air Force Chief : इदरीस हसन लतीफ भारताचे पहिले मुस्लीम Air Force Chief.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जून : इदरीस हसन लतीफ! स्वतंत्र भारताचे भारताचे पहिले मुस्लीम Air Force Chief. 9 जून 1923 रोजी इदरीस हसन लतीफ यांचा हैद्राबादमध्ये जन्म झाला. इदरीस हसन लतीफ हे एकमेव मुस्लीम आहेत ज्यांनी Air Force officer ते Air Chief Marshal या पदापर्यंत पोहोचण्याची किमया साधली. 2018मध्ये वयाच्या 94व्या वर्षी त्याचं निधन झालं. 1941मध्ये वयाच्या 18व्या वर्षी इदरीस हसन लतीफ हे भारतीय हवाई दलात रूजू झाले होते. त्यानंतर 1981मध्ये ते निवृत्त झाले. रविवारी ( आज ) त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्तानं दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

भारतात राहणं केलं पसंत

भारत – पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी त्यांना भारत किंवा पाकिस्तान पैकी एका हवाई दलाच्या सेवेत रूजू होण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी भारताची निवड केली. कालांतरानं त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं. इदरीस हसन लतीफ हे देशाचे 10वे हवाई दल प्रमुख होते. इदरीस हसन लतीफ यांचे मित्र मलिक नूर आणि असगर खान पाकिस्तानमध्ये गेले आणि सेना प्रमुख झाले. दोन्ही मित्रांनी त्यांना पाकिस्तानमध्ये येण्यास सांगितले. पण, इदरीस हसन लतीफ यांनी मात्र भारतामध्ये राहणे पसंत केलं.

भारत – पाकिस्तान फाळणीपूर्वी या तीनही मित्रांनी भारतासाठी दुसऱ्या महायुद्धाची लढाई एकत्र लढली. पण, 24 वर्षानंतर म्हणजे 1971च्या युद्धात पाकिस्तानला भारतासमोर आत्मसमर्पण करावं लागलं. त्यावेळी इदरीस हसन लतीफ हे असिस्टंट एअर चीफपदावर होते. भारतीय हवाई दलात मिग – 21 आणि मिग – 25 विमानांना दाखल करून घेण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प

First published: June 9, 2019, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading