• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ICMR चा नवा धक्कादायक अहवाल: रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या 3.6 टक्के रुग्णांना Black Fungus

ICMR चा नवा धक्कादायक अहवाल: रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या 3.6 टक्के रुग्णांना Black Fungus

आयसीएमआरनं (ICMR) एका अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या आणि दगावलेल्या रुग्णांमध्ये मोठी संख्या सेकंडरी इन्फेक्शनमुळे मृत्यू झालेल्यांची आहे. 10 रुग्णालयांतल्या केसेसचा अभ्यास करून त्यांनी हा दावा केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 मे : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळं (Corona second Wave) देशात सर्वत्र बिकट स्थिती निर्माण झाली आहे. आता दर दिवशी सापडणारी कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत असली तर मृत्यूदर आणि ब्लॅक फंगसमुळं (काळी बुरशी) चिंता वाढली आहे. काळी बुरशी, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचे देखील रुग्ण आढळून येवू लागले आहेत. त्यापैकी काळी बुरशीचे रुग्ण सर्वाधिक आहेत. दरम्यान, आयसीएमआरनं (ICMR) एका अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेले जवळपास 3.6 टक्के रुग्ण सेकंडरी बॅक्टिरीयल आणि फंगल इन्फेक्शनग्रस्त आहेत. आयसीएमआरने हा अहवाल सोमवारी प्रकाशित केला. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार आयसीएमआरने ताजा अहवाल सोमवारी प्रकाशित केला त्यात दुसऱ्या लाटेत सेकंडरी इन्फेक्शनमुळे बहुतांश मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये सेकंडरी बॅक्टिरीयल रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढून 56.7 टक्के झाले आहे. तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण 10.6 टक्के आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सेकंडरी बॅक्टिरीयलमुळं मृत्यूदर 78.9 टक्क्यांपर्यंत वाढला होता. हे वाचा - भारतात सुरू झालं रशियन Sputnik V लशीचं उत्पादन, देशातील सर्वात मोठी कंपनी बनवणार 10 कोटी डोस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्यूकर मायकोसिस (mucer mycosis) आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली त्याला स्टेरॉईडचाही संबंध आहे. स्टेरॉईडचा अती मारा केल्यामुळं या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत. दुसरी लाट ज्यावेळी देशात थैमान घालत होती. त्यावेळी बाजारातून ही स्टेरॉईड औषध गायब झाली होती. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. ज्यादा शक्तिशाली औषधांचा रुग्णांवर मारा करणे घातक ठरू शकते याविषयी इशारा देण्यात आला आहे, असं सर गंगा राम रुग्णालयाच्या सूक्ष्म जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. चंद वट्टल यांनी सांगितलं. हे वाचा - शिक्षकाचे कारनामे; टॉवेल गुंडाळून शिकवायचे, अश्लील वर्तन वाढल्यानं विद्यार्थी एकवटले.. ते पुढे म्हणाले की, संक्रमणात वाढ करण्यामध्ये सर्वसाधारण रोगकारक क्लेबसिएला निमोनिया आणि एसिनेटोबॅक्टर बाउमानी होते. सर्वसाधारणपणे ई कोली गेल्या आईसीएमआर रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणं सापडणारा सर्वात सामान्यजनक रोग प्रकार आहे. एकाच वेळी दोन पद्धतीचं संक्रमण रोखण्यासाठी इलाज कठीण जायचं. कारण विषाणूच्या स्वरुपात सातत्यानं बदल झाल्याचं दिसून येत होतं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर इलाज करणं फार अवघड व्हायचं.
  Published by:News18 Desk
  First published: