मराठी बातम्या /बातम्या /देश /

नववी-दहावी नव्हे तर आधी प्राथमिक शाळा उघडा - ICMR ने का दिला हा सल्ला?

नववी-दहावी नव्हे तर आधी प्राथमिक शाळा उघडा - ICMR ने का दिला हा सल्ला?

शाळा कधी उघडणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यावर ICMR  ने त्यांच्या ताज्या Sero सर्व्हेच्या आधारे मोलाचा सल्ला दिला आहे.

शाळा कधी उघडणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यावर ICMR ने त्यांच्या ताज्या Sero सर्व्हेच्या आधारे मोलाचा सल्ला दिला आहे.

शाळा कधी उघडणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यावर ICMR ने त्यांच्या ताज्या Sero सर्व्हेच्या आधारे मोलाचा सल्ला दिला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 20 जुलै: कोरोनाव्हायरस साथीच्या बाबतीत आता देश पाच महिन्यांपूर्वी होता, त्याच अवस्थेत पुन्हा आहे. दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) भर ओसरताना दिसत आहे. त्यामुळे साधारण वर्षाच्या सुरुवातीला जशा दैनंदिन रुग्णसंख्येत घट दिसली होती, तशी आता पुन्हा दिसते आहे. पण त्याच वेळी तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा  (third wave of covid-19) इशारा दिल्याने प्रशासन सावध आहे. कुठल्याही राज्याने सगळं एकदम उघडण्याचा (Unlock) निर्णय घेतलेला नाही. शाळा कधी उघडणार (ICMR on school reopening) हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यावर ICMR  ने त्यांच्या ताज्या Sero सर्व्हेच्या आधारे मोलाचा सल्ला दिला आहे.

आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, जगभरातच सुरुवातीला मोठ्या वयाच्या मुलांची शाळा, कॉलेज सुरू झाली होती. भारतातही नववी-दहावीचे वर्ग काही भागात सुरू करण्याचा निर्णय झाला होता. प्राथमिक शाळा तर पहिल्या लॉकडाउननंतर बंदच आहेत. पण ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आधी लहान मुलांची शाळाच सुरू करणं फायद्याचं ठरणार आहे.

चिंताजनक! लसीकरण झालेल्या महिला डॉक्टरला Coronaच्या दोन व्हेरिएंटची लागण

लहान मुलांची व्हायरसचा मुकाबला करण्याची शक्ती मोठ्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं असेल तर प्राथमिक शाळा उघडायला हरकत नाही, असं भार्गव म्हणाले.

देशभरात करण्यात आलेल्या चौथ्या 'सिरो सर्व्हे'त (Fourth Sero Survey) काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. देशातील 6 ते 17 या वयोगटातील 50 टक्क्याहून अधिक (More than 50 percent) मुलांच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज(antibodies)  आढळून आल्या आहेत. ICMRनं देशातील 6 ते 17 वर्षांदरम्यानच्या व्यक्ती आणि काही आरोग्य कर्मचारी यांना घेऊन केलेल्या ‘सिरो  सर्व्हे’मध्ये 67.6 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून देशातील 40 कोटी नागरिकांमध्ये अँटिबॉडिज नसल्यामुळे त्यांना कोरोनापासून असणारा धोका कायम असल्याचं सिद्ध झालं आहे.

लहान मुलांमध्ये अँटिबॉडिज

देशातील जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज आढळल्याची माहिती ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.

50 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज, तर अजूनही 40 कोटी नागरिकांना धोका

लहान मुलांना कोरोनाची न देताही निम्म्याहून अधिक मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज असणं, हे मुलांना कोरोना होऊन गेल्याचं लक्षण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, School