कुलभूषण जाधव सुटणार की मिळणार मृत्युदंडाची शिक्षा, फेब्रुवारीमध्ये अंतिम फैसला

कुलभूषण जाधव सुटणार की मिळणार मृत्युदंडाची शिक्षा, फेब्रुवारीमध्ये अंतिम फैसला

कुलभूषण हा सर्वसामान्य माणूस नसून तो भारताचा हेर आहे आणि पाकिस्तानात घातपात करण्यासाठी आले होते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे

  • Share this:

इस्लामाबाद, २३ ऑगस्ट- भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल. यासंदर्भात एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केले आहे. जाधवांना सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालय या खटल्याचा निकाल देईपर्यंत स्थगिती मिळाली आहे. जाधव यांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात भारताचा हेर म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र भारताने हे प्रकरण आंरराष्ट्रीय न्यायालयात नेत फाशीची शिक्षा थांबवली आहे.

पाकिस्तानच्या मते, सुरक्षारक्षकांनी मार्च २०१६ मध्ये कुलभूषण जाधव यांना बलूचिस्तान प्रांतातून अटक केली होती. कुलभूषण ईराणमधून पाकिस्तानात आले होते. भारताने मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भारताकडून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात आले होते. या न्यायालयात जाधवांच्या मृत्यूदंडावर स्थगिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातून अंतिम निर्णय येईपर्यंत जाधवांच्या मृत्यूदंडावर स्थगिती देण्यात आली आहे.

VIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला

पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर निर्णय देण्यात येईल. पाकिस्तानने स्पष्टिकरण देताना म्हटले की, कुलभूषण हा सर्वसामान्य माणूस नसून तो भारताचा हेर आहे आणि पाकिस्तानात घातपात करण्यासाठी आले होते. भारताने लिखीत स्वरुपात पाकिस्तानने जाधवांना भारताकडून राजनैतिक मदत मिळू दिली नाही असा आरोप भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात करण्यात आला आहे. भारताकडून अनेकदा विनंती करुनही पाकिस्तानने जाधवांना राजनैतिक मदत मिळू दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 08:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading