'त्यांनी' कोठडीत माझा छळ केला, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांचा खळबळजनक खुलासा

'त्यांनी' कोठडीत माझा छळ केला, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांचा खळबळजनक खुलासा

"दुसऱ्यांदा मला येथे आणलंय. अॅमीबीयासिस झालाय. पोटाचा आजार... सुरुवात तिथून झालीय.. आधी आठ दिवस होतो इथे. अपचनाचा त्रास होता"

  • Share this:

28 आॅगस्ट : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातून जामिनावर सुटका झालेलसे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या

व्हिडिओत पुरोहितांनी जे सांगितलंय ते अंगावर शहारे आणणारं आहे. ही मुलाखत काही दिवसांपूर्वीची आहे. ज्यात पुरोहित यांनी सांगितलंय की कोठडीत त्यांचा कसा छळ झाला आणि देशासाठी लढण्याची त्यांची उर्मी आजही कायम आहे.

व्हिडिओ मुलाखतीतला संवाद जशाचा तसा

 

प्रश्न : कसे आहात सर ? मॅडम कशा आहेत ?

उत्तर : त्या थोड्या पुण्यात कामात आहेत

प्रश्न : शर्मा साहेबांनी सांगितलं तुमची आठवण काढली

उत्तर : राम राम सांग

प्रश्न : होय, मला तुम्हाला भेटायला सांगितले साहेबांनी

उत्तर : अरे, मला माहित नव्हतं मला, तुला भेटायला सांगितले

प्रश्न : नक्की काय झालंय ? सर, तुम्हाला सतत अश्विनीमध्ये आणतायत

उत्तर : काय सांगू तुला, हे दुसऱ्यांदा मला येथे आणलंय. अॅमीबीयासिस झालाय. पोटाचा आजार... सुरुवात तिथून झालीय.. आधी आठ दिवस होतो इथे. अपचनाचा त्रास होता, नागालॅंडमध्ये झाला होता तसा शिवाय थोडा स्ट्रेसही आहे.

प्रश्न :  पण, सर, कसं काय तुम्ही सहन करताय हे सर्व ?

उत्तर :  हे सर्व लष्कराच्या ट्रेनिंगमुळे झालंय 45 मिनिटे दररोज धावणे, शिवाय व्यायाम आता पायदुखीमुळे चालतो. संध्याकाळी परत व्यायाम

प्रश्न :  तुम्ही आहात म्हणून...आमच्यासारखे असते तर ..

उत्तर : असे काही नाही...हे सर्व फौजेवरच्या प्रेमामुळे सहन करण्याची शक्ती मिळाली

प्रश्न :  पण असं का झालं ? का केलं असं त्यांनी ?

उत्तर : नक्की माहीत नाही...यांच्या डोक्यात काय शिजलंय... ते त्यांना वाटतंय की, हे सगळं सोप्पं आहे. मला सांग आपल्याकडे किती सुरक्षितता असते, स्क्रिनिंग आणि सुरक्षा तपासणी असं बाहेर नेणं शक्य आहे का ?

प्रश्न : पण ते म्हणतात की, तुम्ही ते बाहेर घेऊन गेलात

उत्तर : यांना काय सांगणार ? यांना वाटतं लष्करसुद्धा यांच्यासारखंच आहे.

प्रश्न : हो ते वाचून करमणूकच झाली

उत्तर : हो तसंच होतं ते...असं कुठलीही वस्तू कशी काय बाहेर जाईल ? प्रत्येक गोष्टीची नोंदणी होते. वरिष्ठांचा पत्रव्यवहार असतो.

व्यक्ती आणि कुत्रे दोघेही तपासणी करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 08:24 PM IST

ताज्या बातम्या