लखनऊ, 14 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh IAS Officer) एका आयएएस अधिकाऱ्याचं काम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. IAS अधिकारी प्रेम प्रकाश मीणा सध्या चंदोली येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट तैनात आहेत आणि न्याय तुमच्या दारी हा उपक्रम चालवित आहेत. या उपक्रमाअंतर्गत ते स्वत: घरोघरी जाऊन संपत्ती वाद, अतिक्रमण सारख्या प्रश्नांवर उत्तरं शोधतात.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहणारे IAS अधिकारी प्रेम प्रकाश मीणा यांनी जयपूरहून केमिकल इंजिनियरींगमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी IIT मुंबईमधून एमटेक शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी तब्बल दहा वर्षे आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपनींमध्ये काम केलं. 2015 मध्ये ते परतले आणि UPSC ची तयारी सुरू केली.
न्याय आपके द्वार: गाँव-गाँव स्थलिय निरीक्षण कर, मौक़े पर ही 16 मामले निस्तरित किए गए: 1. महरौल 2. अमरसिपुर 3. बड़ोरा 4. भूसिक्रित पुर्वा 5. रामपुर 6. रोहरख 7. निचोटख़ुर्द 8. इलिया 9. देहरिखरद 10. सैदुपुर pic.twitter.com/pmfJUmg9Kn
— Prem Prakash Meena, IAS (@iaspremprakash) October 14, 2021
प्रेम प्रकाश मीणा यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. आणि त्यांना UPSC मध्ये 900 वी रँक मिळाली. यानंतर त्यांनी दुसऱ्यांचा प्रयत्न केला आणि 102 वी रँक मिळवली. त्यांना उत्तर प्रदेशचा केडर मिळाला. त्यांनी बस्तीमध्ये आपली ट्रेनिंग पूर्ण केली. त्यानंतर हाथरसमध्ये एसडीएम म्हणून ते तैनात झाले.
हे ही वाचा-UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगाद्वारे तब्बल 56 जागांसाठी होणार भरती
न्याय आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात..
सध्या प्रेम प्रकाश मीणा न्याय आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहेत. न्याय देण्यासाठी ते दारोदारी जातात. ट्विटरवर त्यांनी असे अनेक प्रसंग शेअर केले आहेत.
Subscribe:https://t.co/b1cn3Pq4ZP pic.twitter.com/sX08LI4DvB
— Prem Prakash Meena, IAS (@iaspremprakash) October 12, 2021
यूट्यूब चॅनलदेखील चालवतात..
आतापर्यंत अधिकाऱ्यानी 800 वाद सोडवले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातूनही त्यांनी 2020 मध्ये ग्राम पंचायत, अतिक्रमण, संपत्ती वादाशी संबंधित व्हिडीओ तयार केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Uttar pradesh