Home /News /national /

'माझी गावाकडची माणसं'; जमिनीवर बसून वृद्धासोबत गप्पा मारताना दिसले झारखंडचे मराठमोळे IAS अधिकारी, Photo

'माझी गावाकडची माणसं'; जमिनीवर बसून वृद्धासोबत गप्पा मारताना दिसले झारखंडचे मराठमोळे IAS अधिकारी, Photo

आयएएस अधिकारी मराठमोळे रमेश घोलप यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ते एका वृद्धासोबत जमिनीवर बसून बोलताना आणि हसताना दिसत आहेत

    नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : सोशल मीडियावर एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल (IAS Officer's Viral Photo) होत आहे. हा फोटो झारखंडच्या कॅडरचे आयएएस अधिकारी मराठमोळे रमेश घोलप यांचा आहे. फोटोमध्ये ते एका वृद्धासोबत जमिनीवर बसून बोलताना आणि हसताना दिसत आहेत. हा फोटो आयएसएस अधिकारी रमेश घोलप (IAS Ramesh Gholap Viral Photo) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. लग्नातील रोमान्स पडला भारी; पाहुण्यांसमोरच धाडकन कोसळले नवरदेव-नवरी, VIDEO IAS रमेश घोलप यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. वृद्ध व्यक्तीसोबत जमिनीवर बसून गप्पा मारणाऱ्या घोलप यांनी फोटो शेअर करत त्याला सुरेख असं कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "तज़ुर्बा है मेरा मिट्टी की पकड़ मजबुत होती है, संगमरमर पर तो हमने पाँव फिसलते देखे हैं". यासोबतच कॅप्शनसोबत त्यांनी मराठी हॅश्टॅगही दिला आहे. आपल्या हॅश्टॅगमध्ये त्यांनी लिहिलं, 'माझी गावाकडची माणसं'. वडिलांचा फोन पाहताच मुलानं पोलिसांना कॉल करून घरी बोलावलं; कारण वाचून व्हाल थक्क IAS रमेश घोलप यांच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयएफएश प्रवीण कासवान यांनी लिहिलं, "हा साधेपणा माझ्या गावात अजूनही कायम आहे. कोणी ओळखत असू किंवा नसो पण 'राम राम' म्हटल्याशिवाय पुढे जात नाही..''. एका वकिलानंही यावर कमेंट करत लिहिलं, आयएएस देशात भरपूर आहेत. त्यांनीही विचार करायला हवा. सध्या इतका साधेपणा आणि लोकांना भेटणंही हे सांगून जातं की चांगले संस्कार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ias officer, Photo viral

    पुढील बातम्या