मराठी बातम्या /बातम्या /देश /

कर्फ्यु काळात परीक्षा दिली अन् पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली

कर्फ्यु काळात परीक्षा दिली अन् पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली

ias krati raj

ias krati raj

मिळालेलं सेंटर असलेल्या शहरात कर्फ्यु असतानाही यूपीएससीची कठीण परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. इतकेच नाही तर ती दिसते एखाद्या मॉडेलसारखी सुंदर. कर्फ्यु काळात परीक्षा कशी दिली याबद्दलची माहिती जाणून घेऊ.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

मुंबई, 28 सप्टेंबर :   सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकजण अपार कष्ट घेतात. दिवसरात्र खूप अभ्यास करतात. पण अनेकांना यश मिळतेच असे नाही. काहीवेळेस छोट्याशा कारणाने यश हुलकावणी देतं. अनेकांना परीक्षेचा अभ्यास कसा आणि कुठून सुरू करावा याबद्दल अपुरी माहिती असते. तरीही अडचणींना तोंड देत राहतात. पण शेवटी यशस्वी होतातच. या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणं कठीण असतं. पण तरीही एका मुलीने तिला मिळालेलं सेंटर असलेल्या शहरात कर्फ्यु असतानाही यूपीएससीची कठीण परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. इतकेच नाही तर ती दिसते एखाद्या मॉडेलसारखी सुंदर. कर्फ्यु काळात परीक्षा कशी दिली याबद्दलची माहिती जाणून घेऊ.

अनेक अडचणींवर मात करत काहीजण लक्ष गाठतातच. अशा व्यक्तींना समाजात नेहमीच आदर आणि मान मिळतो. त्यापैकीच एक म्हणजे कृती राज. कृती राजने 2020 साली यूपीएससीची परीक्षा देली. परंतु, कोविड-19 मुळे कृतीला परीक्षेची तयारी करणं अवघड बनलं. कारण कोविडमुळे देशभरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू झाली. पण कृतीने त्यातूनही मार्ग काढला. सेल्फ स्टडी अर्थात स्वाभ्यासाच्या जोरावर तिने जिद्दीने यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

हेही वाचा - Bhuvan Bam: BB ज्याने सत्यात उतरवून दाखवलं स्वतःचं स्वप्नं; तरुणाईच्या मनासह YouTube वर गाजवतोय अधिराज्य

यूपीएससी मेंनच्या अंतिम फेरीसाठी कृतीला भोपाळला बोलावलं होतं. पण त्यावेळेस भोपाळमध्ये संचारबंदी लागू होती. हॉटेलच्या स्टाफने कृतीला परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत केली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी केवळ 10 मिनिटं ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. कृती राज ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी परीक्षेच्या ठिकाणी गेली, तेव्हा एक गमतीशीर किस्सा घडला. इंटरव्ह्यू घेणार्‍यांनी तिला विचारले, तुझं जेवण झालंय का नाही, त्यावर ती मी सकाळी नाश्ता करून आल्याचे म्हणाली. तिच्या उत्तरावर सगळेचजण मनमोकळं हसले. ज्यामुळे परीक्षेचा ताण कमी व्हायला मदतच झाली. यानंतर कृतीचा इंटरव्ह्यू जवळपास 25 मिनिटं चालला. ज्यात तिला तिच्या एनजीओ आणि हवामान बदलाबद्दल प्रश्न विचारले गेले.

कृतीने बीटेकची पदवी मिळवल्यावर तिला त्याच क्षेत्रात नोकरी करायची नव्हती. तिला मूलभूत किंवा लोकाभिमुख गोष्टींशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. यासाठी तिने कल्पवृक्ष वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली. या एनजीओद्वारे महिला आणि बालकल्याणाशी निगडित गोष्टींवर काम केले जाते. यातूनच मग तिने सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे ठरवले. त्याच्या साहाय्यानेच तिला आपलं ध्येय साध्य करता येणार होतं.

कृतीने यूपीएससीची 2020 मध्ये परीक्षा दिली. देशातून ती 106 वी आली. जुलै 2019 पासून तिने सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेसाठी तयारी केली. सुरूवातीचे 8-10 महिने दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला. यानंतर तिने अभ्यासाची दिशा बदलून करंट अफेअर्सचा अभ्यास सुरू केला. ज्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ती यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली.

First published:

Tags: Upsc exam