मराठी बातम्या /बातम्या /देश /

चांगली नोकरी असताना आयएएस होण्यासाठी अनु कुमारी यांनी घेतला 'हा' निर्णय; कठोर परिश्रमातून मिळवलं यश

चांगली नोकरी असताना आयएएस होण्यासाठी अनु कुमारी यांनी घेतला 'हा' निर्णय; कठोर परिश्रमातून मिळवलं यश

आयएएस अनु कुमारी

आयएएस अनु कुमारी

मुलासोबत राहून परीक्षेची तयारी करणं काहीसं अवघड जात असल्यानं, अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षांसाठी आपल्या आईकडे पाठवून दिलं होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

चंडीगड 3 ऑक्टोबर : हरियाणातील सोनीपत येथील आयएएस अधिकारी अनु कुमारी यांनी चांगली पदवी आणि नोकरी मिळवून सुमारे नऊ वर्षानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना या परीक्षेत यश मिळाले. यश मिळण्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही, असं त्याच्या प्रेरणादायी कहाणीतून दिसून येतं. प्रशासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षांसाठी स्वतःपासून दूर ठेवलं होतं. आयएएस अधिकारी अनु कुमारी यांची कहाणी तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आयएएस अधिकारी अनु कुमारी यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1986 रोजी हरियाणातील सोनीपतमधील एका हिंदू जाट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव बलजितसिंग तर आईचं नाव संतरो देवी असं आहे. अनु कुमारी यांना एक लहान बहीण आणि दोन भाऊदेखील आहेत. अनु आपल्या शिक्षणाविषयी खूप सजग होत्या. त्यांनी नावाजलेल्या संस्थांमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

आयएएस अनु कुमारी यांनी सोनीपतमधील शिव शिक्षा सदन येथे प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतील हिंदू कॉलेजमध्ये फिजिक्स विषयात बी.एस्सी ऑनर्स पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पदवीनंतर त्यांनी नागपूर येथील आयएमटीमधून एमबीए पूर्ण केलं.

आयएएस अनु कुमारी एमबीए पूर्ण केल्यानंतर मुंबईतील आयसीआयसीआय बॅंकेच्या शाखेत नोकरी करू लागल्या. 2012 मध्ये गुरुग्राम येथील उद्योगपती वरूण दहिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्या गुरुग्राम येथे शिफ्ट झाल्या. सुमारे नऊ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक परीक्षेची तयारी सुरू केली. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. यासाठी त्यांच्या नकळत मोठ्या भावानं त्यांचा यूपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला होता.

अनु कुमारी प्रशासकीय सेवेसाठी परीक्षेची तयार करत असताना त्यांचा मुलगा केवळ चार वर्षांचा होता. त्याच्यासोबत राहून परीक्षेची तयारी करणं काहीसं अवघड जात असल्यानं, अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षांसाठी आपल्या आईकडे पाठवून दिलं. 2017 मध्ये अनु कुमारी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेत त्यांना दुसरी रॅंक मिळाली. सध्या अनु केरळ केडरमध्ये सेवा बजावत आहेत.

आपल्या लहान मुलाला स्वतःपासून दूर ठेवणं हे कोणत्याही आईसाठी मानसिकदृष्ट्या कठीण असतं. पण अनु कुमारी यांनी स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला होता. परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर अनु कमारी यांनी मिळवलेलं यश नक्कीच प्रेरणादायी म्हणावं लागेल.

First published:

Tags: Ias officer, Upsc, Upsc exam